भारताची बांगलादेशवर मात
By Admin | Updated: June 16, 2014 13:34 IST2014-06-15T23:15:28+5:302014-06-16T13:34:12+5:30
पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने रविवारी बांगलादेशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ७ चेंडू व ७ गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
भारताची बांगलादेशवर मात
मीरपूर : पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने रविवारी बांगलादेशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ७ चेंडू व ७ गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली. गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने बांगलादेशचा डाव ९ बाद २७२ धावांत रोखला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १६.४ षटकांत १ बाद १०० धावांची मजल मारली असता पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर थकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर भारतापुढे २६ षटकांत १५० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. भारताने विजयासाठी आवश्यक धावा २४.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या विजयात अजिंक्य रहाणे (६४ धावा, ५ चौकार, २ षटकार), रॉबिन उथप्पा (५०), अंबाती रायडू (नाबाद १६) आणि सुरेश रैना (नाबाद १५) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.