शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Asian Champions Trophy : चक दे इंडिया!; भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची जीरवली, उपांत्य फेरीत एन्ट्री मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:01 IST

Men’s Asian Champions Trophy in Dhaka भारतानं मागील सामन्यात बांगलादेशवर 9-0 असा मोठा विजय मिळवला होता अऩ् आत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली.  

Men’s Asian Champions Trophy in Dhaka- बांगलादेश येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतानं शुक्रवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 3-1 असा दणदणीत विजय मिळवला. भारतानं या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. भारताकडून हरमनप्रीतने उल्लेखनीय कामगिरी करताना दोन गोल केले, तर आकाशदीपनं एक गोल केला. पाकिस्तानकडून एकमेव गोल जुनैद मंजूर यानं केला. भारतानं मागील सामन्यात बांगलादेशवर 9-0 असा मोठा विजय मिळवला होता अऩ् आत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली.  

पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी सामन्यावर मजबूत पकड घेतली. त्यामुळे 7व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यावर हरमनप्रीतनं गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.  दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीयांनी चेंडूवर ताबा राखताना पाकिस्तानवर दडपण निर्माण केलं होतं. पण, भारताच्या नीलम संजीवकडून फाऊल झाला आणि त्याला दोन मिनिटांसाठी मैदानाबाहेर बसावं लागलं. 10 खेळाडूंसह खेळणारा भारतीय संघ तरीही पाकिस्तानवर भारी पडला. भारतानं पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी कायम राखली.  तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या पाच मिनिटांत भारतानं पाकिस्तानच्या गोलक्षेत्रात आक्रमण सुरू केले, परंतु त्यांना यश मिळत नव्हते. अखेर 42व्या मिनिटाला आकाशदीपनं अप्रतिम गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. पण, 44व्या मिनिटाला पाकिस्तानकडून जुनैदनं गोल केला अन् पिछाडी 1-2 अशी कमी केली.   चौथ्या क्वार्टरमध्ये 47व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु भारताचा कर्णधार मनप्रीत सिंहनं रिव्ह्यू घेतला अन् हा कॉर्नर नाकारण्यात आला. 53व्या मिनिटाला पाकिस्तानकडे गोल करण्याची आयती संधी होती, परंतु भारताचा गोलरक्षक कृष्णा पाठकनं तो अडवला. 54व्या मिनिटाला मात्र हरमनप्रीतनं पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करून भारताची आघाडी 3-1 अशी मजबूत केली अन् विजयही पक्का केला. उर्वरित वेळेत भारतानं बचावात्मक खेळ केला. 

टॅग्स :HockeyहॉकीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान