क्रिकेटमध्येही भारत पाकिस्तानच्या उरी... न्यूझीलंडला नमवत रँकिंगमध्ये अव्वल

By Admin | Updated: October 3, 2016 17:47 IST2016-10-03T11:04:56+5:302016-10-03T17:47:44+5:30

न्यूझीलंडसोबत दुसरा कसोटी सामना खेळणा-या भारताने मालिका 2 - 0 अशी खिशात टाकतानाच कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले.

India also have the top spot in the ranking rankings in New Zealand | क्रिकेटमध्येही भारत पाकिस्तानच्या उरी... न्यूझीलंडला नमवत रँकिंगमध्ये अव्वल

क्रिकेटमध्येही भारत पाकिस्तानच्या उरी... न्यूझीलंडला नमवत रँकिंगमध्ये अव्वल

>
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 3 - न्यूझीलंडचा 197 धावांमध्ये धुव्वा उडवत भारताने 179 धावांनी दुसरी कसोटी जिंकत मालिका 2 - 0 अशी खिशात टाकली आहे. भारताने पहिल्या डावात 316 व दुसऱ्या डावात 263 धावा केल्या. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात 204 व दुसऱ्या डावात 197 धावा केल्या. गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या सामन्यामध्ये न्यूझीलंडसमोर विजयासाठी 376 धावांचे लक्ष्य होते. मात्र, प्रत्येकी तीन विकेट घेणाऱ्या अश्विन व जाडेजाने किवींना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. त्यांना भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शामीने चांगली साथ दिली.  शेवटचा गडी मोहम्मद शमीने टिपला. त्याच्या बाउन्सरवर मुरली विजयकडे झेल देत बोल्ट बाद झाला आणि भारताने मालिका खिशात टाकतानाच कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले. दोन्ही डावांमध्ये अर्धशतके झळकावणाऱ्या आणि चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या वृद्धीमान साहाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहलीनेही एक विक्रम केला आहे. पाच कसोटी मालिकांमध्ये एकही मालिका न गमावण्याचा विक्रम कोहलीने केला आहे.
 
दरम्यान, भारताने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी राहण्याचा काळ...
 
- नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2011 - 21 महिने
- जानेवारी 2016 ते फेब्रुवारी 2016 - 1 महिना
- ऑगस्ट 2016 ते ऑगस्ट 2016 - 5 दिवस
- ऑक्टोबर 2016 ते ---
 
 
भारताने दुसऱ्या डावामध्ये रोहीत शर्मा (82), वृद्धीमान साहा (58) आणि विराट कोहली (45) यांच्या जीवावर चांगली धावसंख्या उभी केली आणि न्यूजीलंडसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय गोलंदाजांनाही चांगला मारा करत भारताला चौथ्या दिवसाअखेरीसच विजय मिळवून दिला. लेथम वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही.
या विजयामुळे भारताने कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तान रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होता, मात्र या विजयामुळे आता भारत पहिल्या स्थानी आला आहे.
भारताचा दुसरा डाव 263 धावांवर आटोपला होता आणि विजयासाठी 376 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. न्यूझीलंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळत 112 धावांची आघाडी घेणाऱ्या भारताने अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दुसऱ्या डावात 8 बाद 227 धावांची मजल मारली होती. आज सकाळी खेळ सुरु झाल्यानंतर भारताने आपल्या राहिलेल्या दोन विकेट्सही गमावल्या. ईडन गार्डनमध्ये आतापर्यंत विदेशी संघाची चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या 233 आहे. ही धावसंख्या 1961-62मध्ये इंग्लंडने फटकावली होती. त्यामुळे या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघापुढे मोठे आव्हान आहे.
 
रोहित शर्माने आपल्या आवडत्या ईडन गार्डन मैदानावर सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी ८२ धावांची खेळी केली आणि त्याने रिद्धिमान साहासोबत शतकी भागीदारी करीत भारताला न्यूझीलंडविरुद्ध ३०० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून दिली होती. रोहित, साहा व विराट यांच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
 
 
पहिल्या डावात ३१६ धावा फटकाविणाऱ्या भारताची कर्णधार विराट कोहलीच्या ४५ धावांच्या खेळीनंतरही दुसऱ्या डावात एकवेळ ६ बाद १०६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रोहित व साहा (नाबाद ३९) यांनी सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. ईडनवर गेल्या पाच कसोटी सामन्यांत भारतातर्फे सातव्या विकेटसाठी ही पाचवी शतकी भागीदारी ठरली. 
 
सुरुवातीला जपून खेळणाऱ्या रोहितने त्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना काही आकर्षक फटके मारले. दुसऱ्या टोकाकडून साहाने त्याला योग्य साथ दिली. पहिल्या डावात नाबाद ५४ धावांची खेळी करणाऱ्या साहाने दुसऱ्या डावातही बचावात्मक व आक्रमक खेळाचा नजारा सादर केला.

Web Title: India also have the top spot in the ranking rankings in New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.