भारताने पुन्हा ऑस्ट्रेलियाला धुतले
By Admin | Updated: November 9, 2014 02:19 IST2014-11-09T02:19:14+5:302014-11-09T02:19:14+5:30
आशियाडचा सुवर्णविजेत्या भारतीय हॉकी संघाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला शनिवारी पुन्हा धूळ चारून 1-क् अशा विजयासह मालिकेत 2-1 ने आघाडी मिळविली.

भारताने पुन्हा ऑस्ट्रेलियाला धुतले
पर्थ : आशियाडचा सुवर्णविजेत्या भारतीय हॉकी संघाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला शनिवारी पुन्हा धूळ चारून 1-क् अशा विजयासह मालिकेत 2-1 ने आघाडी मिळविली. भारताने पहिला सामना क्-4 ने गमावला होता. यानंतर भारताने जोरदार मुसंडी मारून पुढचे दोन्ही सामने जिंकले.
तिस:या सामन्यात कर्णधार सरदारासिंगच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व ड्रॅगफ्लिकर रुपिंदरसिंग याने सांभाळले. आपल्या शंभराव्या सामन्यातील विजय त्याने विश्वविजेत्याला पराभूत करीत साजरा केला. उभय संघांनी सामन्याची सुरुवात आक्रमकपणो केली; पण पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना लाभ मिळू शकला नाही. दुस:या क्वॉर्टरमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया चांगलेच झुंजले. भारतीयांनी एक-दोन संधी गमावताच गोल होऊ शकला नाही. तिस:या क्वॉर्टरमध्ये 34 व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने दिलेल्या पासवर एस. व्ही. सुनीलने चेंडूला ऑस्ट्रेलियाच्या गोलमध्ये टाकले. हा गोल झाल्यानंतर, भारतीय खेळाडू अधिक आक्रमक होऊन खेळले. भारतीयांची चेंडूवर पकड निर्माण होताच, त्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव आणण्याचा प्रय} केला. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने पुरेपूर प्रय} करूनही त्यांना सामन्यात बरोबरी करण्याची संधी मिळाली नाही. मालिकेतील चौथा सामना उद्या रविवारी खेळला जाईल. (वृत्तसंस्था)