बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्ड, सर्फिंगचा पुढील आॅलिम्पिकमध्ये समावेश
By Admin | Updated: August 4, 2016 20:21 IST2016-08-04T20:21:21+5:302016-08-04T20:21:21+5:30
आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये पाच नव्या खेळांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.

बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्ड, सर्फिंगचा पुढील आॅलिम्पिकमध्ये समावेश
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ४ : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये पाच नव्या खेळांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. रिओत सुरू असलेल्या आयओसीच्या १२९ व्या संमेलनात बुधवारी हा निर्णय झाला. समितीने ज्या पाच खेळांना पुढील आॅलिम्पिकमध्ये समावेशास मंजुरी दिली त्यात बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्ड आणि सर्फिंग या खेळांचा
समावेश आहे. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पकमध्ये बेसबॉल व सॉफ्टबॉलचा समावेश होता.
आता पुन्हा एकदा हे खेळ आॅलिम्पिकचा भाग बनले. यात प्रत्येकी सहा- सहा संघ असतील. खेळात अधिक युवकांचा समावेश व्हावा यामुळेच टोकियो
आॅलिम्पिकमध्ये खेळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष थॉमस बाक यांंनी स्पष्ट केले