आॅलिम्पिक यजमानपद संयुक्तपणे देण्याचा विचार

By Admin | Updated: November 19, 2014 23:31 IST2014-11-19T23:31:55+5:302014-11-19T23:31:55+5:30

यजमानपद एका शहराला देण्याची परंपरा मोडीत काढण्याचा आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक परिषदेचा (आयओसी) विचार आहे.

The idea of ​​jointly organizing an Olympic host | आॅलिम्पिक यजमानपद संयुक्तपणे देण्याचा विचार

आॅलिम्पिक यजमानपद संयुक्तपणे देण्याचा विचार

लुसाने : यजमानपद एका शहराला देण्याची परंपरा मोडीत काढण्याचा आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक परिषदेचा (आयओसी) विचार आहे. यापुढे एखादा संपूर्ण देश, एकापेक्षा अधिक शहरे किंवा एकाहून अधिक देशांना संयुक्तपणे हे आयोजन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॉश यांच्या सुधारणावादी अजेंड्यात ज्या ४० सुधारणांचा उल्लेख आहे, त्यातही या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त बोली प्रक्रियेमुळे क्रीडा स्पर्धा अधिक आकर्षक तर होतीलच, शिवाय आर्थिक ओझे कमी होईल, असा विश्वास आयओसीने व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना बॉश म्हणाले, ‘आम्ही दावेदारीत सुसूत्रता आणू इच्छितो. या नव्या प्रस्तावांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन यजमान शहराबाहेर किंवा विशिष्टप्रकरणी दुसऱ्या देशात आयोजनाची आयओसी परवानगी देईल. हिवाळी आॅलिम्पिकमधील काही क्रीडा प्रकार सीमारेषेजवळील इतर देशात आयोजित करण्यात येतात; पण उन्हाळी आॅलिम्पिकमध्ये असे प्रथमच होईल.
बॉश यांच्या प्रस्तावानुसार उन्हाळी आॅलिम्पिकमधील २८ क्रीडा प्रकारांमध्ये आणखी काही खेळांची भर पडू शकते; पण खेळाडूंची संख्या मात्र १०,५०० इतकीच राहील आणि पदकेदेखील ३१० वाटली जातील. प्रस्तावानुसार यजमान शहर आपल्या पसंतीचे एक दोन खेळ सहभागी करण्याचा प्रस्ताव ठेवू शकते. अर्थात, २०२०च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये बेसबॉल आणि सॉफ्टबॉल या खेळांचा समावेश होऊ शकतो. हे दोन्ही खेळ २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकपासून वगळण्यात आले. जपानमध्ये मात्र हे खेळ लोकप्रिय आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The idea of ​​jointly organizing an Olympic host

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.