आयसीसी टी-२० वर्ल्डकप, झिम्बाब्वेचा पहिला विजय
By Admin | Updated: March 8, 2016 19:17 IST2016-03-08T19:12:59+5:302016-03-08T19:17:17+5:30
आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने हॉंगकॉंगवर १४ धावांनी विजय मिळवून स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप, झिम्बाब्वेचा पहिला विजय
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ८ - आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने हॉंगकॉंगवर १४ धावांनी विजय मिळवून स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. हॉंगकॉंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
झिम्बाब्वेकडून सलामीवीर सिबांडाची ५९ धावांची अर्धशतकी खेळी चिगुमबुराच्या नाबाद ३० धावा आणि वॉलरच्या २६ धावा यांच्या छोटया उपयुक्त खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने निर्धारीत वीस षटकात १५८ धावा केल्या.
हॉंगकॉंगकडून सलामीवीर अॅटकीनसनच्या ५३ धावा आणि तन्वीर अफझलच्या ३१ धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांना वीस षटकात १४४ धावांपर्यंत मजल मारत आली. पात्रता फेरीत आठ संघ झुंज देत असून, यातील अव्वल दोन संघ सुपर टेन संघांसोबत मुख्य फेरीत खेळणार आहेत.