सिडनी : पुढील विश्वचषक स्पर्धेत सहभागी संघांची संख्या १४ वरुन दहा करण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) निर्णयावर विक्रमादित्य सचिन तेंडूलकर याने नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा विचार म्हणजे एक पाऊल मागे जाणे आहे. उलट अगामी विश्वचषकात २५ संघ कसे खेळतील यावर आयसीसीने विचार करायला हवा. संघांची संख्या कमी करण्याचा निर्णय सहयोगी देशांसाठी अयोग्य असल्याचेही मत त्याने व्यक्त केले आहे.
आयसीसीचे पाऊल पडते मागे : सचिन
By admin | Updated: March 4, 2015 23:55 IST