संशयित गोलंदाजीबाबत आयसीसीचे नियम विचित्र : अजमल
By Admin | Updated: November 5, 2015 02:38 IST2015-11-05T02:38:35+5:302015-11-05T02:38:35+5:30
संशयित गोलंदाजी शैलीमुळे आपल्या कारकिर्दीत अडथळा आल्यामुळे निराश पाकिस्तानी आॅफस्पिनर सईद अजमल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर जोरदार टीकास्त्र सोडले

संशयित गोलंदाजीबाबत आयसीसीचे नियम विचित्र : अजमल
कराची : संशयित गोलंदाजी शैलीमुळे आपल्या कारकिर्दीत अडथळा आल्यामुळे निराश पाकिस्तानी आॅफस्पिनर सईद अजमल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि त्यांचे नियम विचित्र असून ते आॅफस्पिन गोलंदाजी संपवून टाकतील, असे म्हटले आहे.
आयसीसी आपल्या नियमांची अंमलबजावणी करू इच्छिते, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वच गोलंदाजांची शैली तपासायला हवी. अजमल म्हणाला, ‘‘फक्त आॅफस्पिनरलाच का निशाणा बनवले जाते? डावखुरे स्पिनर अथवा लेगस्पिनर किंवा वेगवान गोलंदाजांना का नाही? मी अनेकदा या गोलंदाजी समीक्षेच्या प्रक्रियेतून गेलो आणि ही प्रक्रिया फार जवळून पाहिली आहे. जर खरेच चाचणी घेतली गेल्यास अनेक गोलंदाजांच्या हाताचा कोपरा १५ डिग्रीच्या मर्यादेपेक्षा जास्त वळतो. मी त्यांचे नाव घेणार नाही. हे गोलंदाज नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर कोणाचेही लक्ष नाही.’’ भारतीय आॅफस्पिनर हरभजनसिंग आणि आर. आश्विन यांच्या शैलीत कोणालाही कमतरता दिसत नाही. (वृत्तसंस्था)