आयसीसी रँकिंगमध्ये विजय ११व्या स्थानावर

By Admin | Updated: November 10, 2015 23:17 IST2015-11-10T23:17:49+5:302015-11-10T23:17:49+5:30

दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्या कसोटीत भारताच्या विजयात उत्तम कामगिरी करणारा सलामीचा फलंदाज मुरली विजयने आयसीसी क्रमवारीत ११ वे स्थान मिळवले आहे.

In the ICC rankings, the winner is at 11th position | आयसीसी रँकिंगमध्ये विजय ११व्या स्थानावर

आयसीसी रँकिंगमध्ये विजय ११व्या स्थानावर

दुबई : दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्या कसोटीत भारताच्या विजयात उत्तम कामगिरी करणारा सलामीचा फलंदाज मुरली विजयने आयसीसी क्रमवारीत ११ वे स्थान मिळवले आहे. भारतीय फलंदाजापैकी तो सर्वात वरच्या स्थानावर आहे. या रँकिंगमध्ये ए.बी.डिव्हिलियर्स पहिल्या स्थानी आहे.
विजयने मोहालीत पहिल्या कसोटीत ७५ व ४७ धावांची खेळी केली होती. भारतीय फलंदाज पहिल्या दहात पोहोचू शकले नाहीत. चेतेश्वर पुजारानेही ३१ आणि ७७ धावांची खेळी केली होती. मात्र पुजारा १३ व्या स्थानावर आहे. कसोटी कर्णधार कोहलीने या कसोटीत १ आणि २९ धावांची खेळी केली. तो पाच स्थानांनी घसरला. सध्या विराट १६ व्या स्थानावर आहे. याच कसोटीत पहिल्या डावांत ६३ धावा करणारा धडाकेबाज फलंदाज ए.बी.डिव्हिलियर्स आॅस्ट्रेलियाच्या स्टिवन स्मिथला एका गुणाने मागे टाकत अव्वल स्थानी विराजमान आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: In the ICC rankings, the winner is at 11th position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.