आयसीसीला समांतर संघटनेची ब्ल्यू प्रिंट

By Admin | Updated: August 11, 2015 00:42 IST2015-08-11T00:42:24+5:302015-08-11T00:42:24+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) समांतर अशा संघटनेची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार असून, या संघटनेची नाळ आॅलिम्पिकसोबत जोडण्याची योजना असल्याचा गौप्यस्पोट

ICC Principal Organization Blue Print | आयसीसीला समांतर संघटनेची ब्ल्यू प्रिंट

आयसीसीला समांतर संघटनेची ब्ल्यू प्रिंट

लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) समांतर अशा संघटनेची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार असून, या संघटनेची नाळ आॅलिम्पिकसोबत जोडण्याची योजना असल्याचा गौप्यस्पोट आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी यांनी केला आहे. ही संघटना म्हणजे जगातील क्रिकेटचे भविष्य असल्याचा दावा मोदी यांनी
केला आहे. मोदी यांनी समांतर संघटनेचे वृत्त देताना क्रिकेटविश्वाचे लक्ष पुन्हा एकदा आपल्याकडे
वेधले आहे. मोदी यांच्या
वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले मोदी सध्या लंडनमध्ये आहेत. समांतर संघटनेला आॅलिम्पिकची मान्यता राहणार असून, ही संस्था कसोटी आणि टी-२० क्रिकेटचे संचालन करणार आहे. वन-डे क्रिकेट प्रारूप रद्द करण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले.
ललित मोदी म्हणाले, ‘आम्ही वेगळ्या क्रिकेट संघटनेबाबत चर्चा करीत असून, त्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. समांतर संघटना स्थापन करण्याच्या कार्यात माझा सक्रिय सहभाग असून, ब्ल्यू प्रिंट तयार करण्याच्या कार्यात माझा सहभाग होता. मी प्रथमच हे जाहीरपणे सांगत आहे. या संघटनेला विद्यमान संघटनेचे आव्हान पेलावे लागू शकते.
सध्या संघटनेचे कुणीच सदस्य
नाही. त्यासाठी काही अरब डॉलर्सची गरज भासेल आणि काम सुरू करण्यासाठी ही राशी मिळविण्यास मोठी अडचण भासेल, असे मला वाटत नाही.’
ललित मोदी पुढे म्हणाले, ‘मी आखलेली योजना व्यापक आहे.
घाईघाईत ही योजना आखलेली नसून त्यासाठी अनेक वर्षे लागली.’ वर्ष २०१०मध्ये आयपीएलच्या आयुक्त पदावरून बर्खास्त करण्यात आलेल्या ललित मोदी यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या केसमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट निघालेला आहे.
मोदी यांनी हे आरोप
फेटाळून लावले. बीसीसीआयचे माजी
अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या आयसीसीने काही सकारात्मक पाऊल उचलले तरच माजी योजना अपयशी ठरेल, असे मोदी यांनी म्हटले
आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: ICC Principal Organization Blue Print

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.