आयसीसी आचारसंहिता, डीआरएस पंच अपीलमध्ये बदल
By Admin | Updated: September 22, 2016 21:21 IST2016-09-22T21:21:24+5:302016-09-22T21:21:24+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडू तसेच सहयोगी स्टाफसाठी आचारसंहिता तसेच डीआरएसमधील पंचांच्या अपीलामध्ये बदल केला आहे.

आयसीसी आचारसंहिता, डीआरएस पंच अपीलमध्ये बदल
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. २२ : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडू तसेच सहयोगी स्टाफसाठी आचारसंहिता तसेच डीआरएसमधील पंचांच्या अपीलामध्ये बदल केला आहे. आचारसंहितेत गुन्ह्याची यादी, गुन्ह्याबद्दल तंबी, दंड अथवा निलंबन यामध्ये कुठलेही बदल केले नाहीत. पण संहितेचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूच्या नावापुढे नकारात्मक गुण जमा होतील. यामुळे सातत्याने चुका करणाऱ्या
खेळाडूला निलंबनासही सामोरे जावे लागेल.
नकारात्मक गुण दोन वर्षे खेळाडूंच्या नावापुढे जमा होत राहतील. सर्व खेळाडू २२ सप्टेंबरपासून झिरो बॅलेन्सने सुरुवात करणार आहेत. पायचितच्या निर्णयाशी संबंधित पंचाच्या कॉलचा नियमदेखील २२ सप्टेंबरपासून अंमलात आला. नव्या नियमांतर्गत पहिला सामना रविवारी द. आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात बेनोनी येथे खेळविण्यात येणार आहे.