आयबीसीचे भिवानी, पतियालामध्ये क्लिनिक

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:47+5:302015-07-10T21:26:47+5:30

IBC Bhiwani, Patiala Clinic | आयबीसीचे भिवानी, पतियालामध्ये क्लिनिक

आयबीसीचे भिवानी, पतियालामध्ये क्लिनिक

>नवी दिल्ली: देशभरातील व्यावसायिक मुष्टियोद्धांसाठी प्रतिभावंताच्या शोध मोहिमेसाठी भारतीय मुष्टियुद्ध परिषद (आयबीसी) १३ ते१५ जुलै दरम्यान भिवानी आणि पतियालामध्ये क्लिनिकचे आयोजन करणार आहे़ या क्लिनिकचे आयोजन आयबीसी अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर पी़के़ मुरलीधरन राजा यांनी केले आहे़ राजा म्हणाले, या क्लिनिकदरम्यान आम्ही मुष्टियुद्धा आणि प्रशिक्षकांना व्यावसायिक मुष्टियुद्धाचे कोणते फायदे आहेत हे सांगणार आहोत़ जर प्रमोटर्स सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांचेही स्वागत आहे़ केवळ कुशल आणि दमदार मुष्टियुद्धाच यामध्ये खेळू शकतात़ आम्ही मुष्टियुद्धांना याबाबत प्रशिक्षित करणार आहोत़

Web Title: IBC Bhiwani, Patiala Clinic