मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नव्हतोच : शुक्ला
By Admin | Updated: October 1, 2015 22:42 IST2015-10-01T22:42:17+5:302015-10-01T22:42:17+5:30
बोर्डाचा मी नेहमीच प्रामाणिक सदस्य राहिलो. अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी कधीही नव्हतोच, असे स्पष्ट करीत आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी

मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नव्हतोच : शुक्ला
मुरादाबाद : बोर्डाचा मी नेहमीच प्रामाणिक सदस्य राहिलो. अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी कधीही नव्हतोच, असे स्पष्ट करीत आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अध्यक्षपदाचे दावेदार अॅड. शशांक मनोहर यांना पाठिंबा दर्शविला आहे.
मनोहर २००८ ते २०११ या काळात बीसीसीआयचे पहिल्यांदा अध्यक्ष होते. आता पुन्हा एकदा त्यांचीच वर्णी लागेल. उत्तर प्रदेश- मध्य प्रदेश रणजी सामन्याला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शुक्ला पुढे म्हणाले, ‘‘मी मनोहर यांच्यासोबत आहे. मनोहरांमुळे बीसीसीआयच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र सुधारणा होईल.’ तुमच्या नावाचीदेखील चर्चा सुरू होती, असे विचारताच ते म्हणाले, ‘मी कधीही शर्यतीत नव्हतो. बोर्डाचा मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. बोर्डाच्या हितासाठी मी काम करीत आलो आहे.’ आयसीसी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे आमसभेत भाग घेऊ शकणार नाहीत; मात्र गरज भासल्यास मतदान करू शकतात, यावर शुक्ला म्हणाले, ‘त्यांच्या मतदानामुळे विशेष फरक पडणार नाही.’(वृत्तसंस्था)