शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खुंदक है मुझे समाज के विचारों से... पर जज्बा भी है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 06:57 IST

दीपा मलिक : वेदनेतून स्वयंप्रेरणेचा प्रवास

टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली: राजधानीजवळच्या गुरुग्रामधील एस्सेल टॉवरमधील सूबक फ्लॅटचा दरवाजा उघडताच सरळ दिवाणखाण्यात प्रवेश होतो. देखणे फर्निचर त्यावर रचलेली पदके. एका भिंतीभर पसरलेले पद्मश्री पुरस्कारा स्वीकारतानाचे छायाचित्र. देशविदेशात मिळालेली सन्मानचिन्हे. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाली महिला दीपा मलिक यांचे हे निवासस्थान. स्पोर्ट्स शूज, ‘रिओ (ऑलिम्पिक) २०१६’ चा लोगो असलेला टी शर्ट परिधान केलेल्या दीपा आपल्या जगण्याची वेदना खिलाडूवृत्तीने मांडतात. २०१६च्या रिओ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले रौप्यपदक मिळवणाऱ्या दीपा मलिक यांच्यामुळे देशवासियांची मान उंचावली. पद्मश्री, खेलरत्न पुरस्काराने दीपा यांचा सन्मान करण्यात आला. शारीरीक मर्यादा तरी त्रागा नाही की तक्रार नाही. स्वत:चे जगणे नितांतसुंदर करुन असंख्य दिव्यांगासाठी झटणाºया, त्यांना प्रेरणा देणाºया दीपा यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा मारल्या...

तुमच्यात सैनिकी शिस्त आहे, असे म्हणतात.- होय. माझे वडील सैन्यात होते. पतीही सैन्यात होते. माझी आई नेमबाज होती. बिकानेरचे महाराजा कर्णिसिंंह यांच्या टीममध्ये होती. कुटुंबात सर्वांनाच खेळांची आवड होती. गुजरातमधील जामनगरमध्ये आम्ही रहायचो. सहा वर्षांची असताना शाळेत जाताना बसमध्ये मला चढता येत नव्हते. वाहन चालक मला बसमध्ये उचलून घेत. वडिलांनी ते पाहिले. तात्काळ रुग्णालयात नेले. चालताना मला भिंत धरावी लागायची. मला उपचारासाठी वडिलांनी वेल्लूरला नेले. जसलोक आणि हिंदूजा हॉस्पिटलमध्ये नेले. समुद्र पहिल्यांदा मी मुंबईत पाहिला, वडिलांच्या खांद्यावर बसून. काही जणांनी वडिलांना लष्करी रुग्णालयात जायला सांगितले. मला पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वर्षभर उपचार सुरु होते. लंबर पंक्चर झाले अनेक. लांब सुई शरीरात खुपसल्यानंतर असहनीय वेदना होत असत. ते १९७६ वर्ष होते. माझ्यासाठी वडिलांनी अखेर मेजर असतनाही कॅप्टनची पोस्टींग घेतली. अशावेळी माझे आजारपण वेगळाच अनुभव घेवून आले.

आजारपणाची वेदना आठवते आजही?- घोरपडी ते कमांड हॉस्पिटल आई सायकल चालवत यायची. माझा भाऊ कधी कधी मागे असायचा. एखादी सामान्य महिला असती तर, ती मोडून पडली असती. पण आई स्पोर्ट्सवूमन होती. वर्षभर मी रुग्णालयात होती. त्यामुळे माझ्यासाठी अनेक बैठे खेळ रचण्यात आले. खूप कथा सांगितल्या. तो प्रभाव आजही कायम आहे. आजारपणात कुटुंब म्हणून आम्ही खूप जवळ आलो. प्रत्येकाची काळजी घ्यावी, त्यांच्याशी जुळावे- ही भावना तीव्र झाली. त्या वेळी मला अपंगत्व आलेय- याची अजिबात जाणीव नव्हती. उलट सर्वाधिक खेळणी, गोष्टी ऐकता यायच्या. पुढे एक्स रे मायलोग्राम करण्यात आला. त्यासाठी शरीर सारखे फिरवावे लागे. अवघ्या सहा वर्षांच्या मुलीला हलणाºया बेडवर जखडले होते. माझ्या आजाराचे निदान झाले. आॅपरेशन झाले. अडीच वर्षे फिजिओथेरपी केली. कधी कॅलिपर, कधी मानेला पट्टा बांधत मी वावरत असे. ८ वर्षांची झाल्यावर पुन्हा चालू लागले. लोक म्हणत असत- ही कशी चालणार? पण मी मात्र केवळ खेळांवर प्रेम असल्याने उभी राहिले. मी तर म्हणेने- बी स्पोर्टी. स्पोर्ट्स ओरिएंटेड असल्यानेच मला खूप मदत झाली.

तुमच्यातील खेळाडू कधी ओळखलात?शाळेत असल्यापासून. अजमेर कॉलेजमध्ये असताना मी बास्केटबॉल खेळायचे. राजस्थानच्या पहिल्या महिला क्रिकेट संघातही माझा समावेश झाला. मुलांशी शर्यत लावून मोटरसायकल पळवायचे. पुढे लग्न झाले. देविकाचा जन्म नागपूरचा. पण दुर्दैव बघा- ती दीड वर्षांची असताना तिचा अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. ज्या कमांड रुग्णालयात मी पुण्यात उपचार घेतले तिथे माझ्या मुलीला नेले. तिची डावी बाजू पूर्ण पॅरालाईज झाली होती. असा अनुभव मलाच का यावा? हे दु:ख माझ्या वाट्याला का आले? असे असंख्य प्रश्न मला त्या वेळी पडले. पण माझ्या पुढे दोन्ही लेकी उत्तम शिकल्या. वेगवेगळ््या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत आहेत.

या प्रवासात आजूबाजूच्या लोकांकडून कसे अनुभव आलेत?लोक म्हणायचे, एकतर मुलगी त्यात अशी. ही पुढे काय करणार? कसे सांभाळणार तुम्ही हिला? माझ्या मुलीला म्हणायचे ‘आईचा आजार लेकीला झाला!’ ते शब्द आजही मला आठवतात. ‘खुंदक हैं मुझे समाज के ऐसे विचारों से! लेकिन थोडा जज्बाभी हैं-कुछ कर गुजरने का!’ माझ्या मुलीवर उपचार केले. ज्या शहरात माझ्या आई-वडिलांनी मला सांभाळले त्याच शहरात. काही लोक तर म्हणाले- ‘आजारपणापेक्षा अपघाती मरण आले तर बरं असतं.’ हेही अनुभव आलेत. दोन्ही मुलींना मी सांभाळले. आज माझीथोरली मुलगी दीपिका दिव्यांगांसाठी मी करीत असलेल्या कार्यात मदत करते.

व्हील चेअरच्या तुमच्या नात्याला वीस वर्षे झालीत.माझी मोठी लेक सात वर्षांची असताना मला पुन्हा त्रास व्हायला लागला. माझ्यावर पुन्हा उपचार सुरु झाले. त्या वेळी नवरा कारगील युद्धासाठी सीमेवर तैनात होते. १९९९ साली मला पाठीचा ट्युमर झाला. कमरेखालचे शरीर कायमस्वरुपी व्हिलचेअरवर सामावले. २० तासांच्या दोन शस्त्रक्रिया. असंख्य वेदना. पण डॉक्टरांनी त्या अत्यंत नाजूक शस्त्रक्रियेत माझे हात कायम ठेवले. थोडीही चूक झाली असती तर कायमस्वरुपी हातांना अपंगत्व आले असते. मला विकलांगता मिळाली, मी दिव्यांगता मिळवली. पुढचा प्रवास तुमच्या समोरआहे. तेरा वर्षे झालीत. मी माझे विश्व कुणाचीही (अगदी नवºयाची देखील) आर्थिक मदत न घेता निर्माण केले. भालाफेक, गोळाफेकीत तरबेज झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅराअ‍ॅथलिट्ससाठी सोय केली-त्याबदल्यात मी पदक मिळवून दिले.

महाराष्ट्राशी तुमचा ऋणानुबंध..खूप जुना आहे. २०१० पर्यंत मी अहमदनगरमध्ये राहिले. तिथे लष्करी अधिकारी-कर्मचाऱ्यांना डबे पुरवले. मला स्थानिक स्वालंबन पुरस्कारही मिळाला. महाराष्ट्राशी माझे जुने नाते आहे. शिवछत्रपती पुरस्कारही मला मिळाला. नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक दुचाकी चालवून मी तेव्हा जागतिक विक्रम केला होता. आम्ही तसे मूळचे हरयाणवी. २००९ साली मला हरियाणात कर्मभूमी पुरस्कार मिळाला. हरियाणावासीयांनी हिणवले होते मला कधीकाळी. पुढे मलिक खाप पंचायतीने सन्मानित केले. २०१० नंतर मी दिल्लीला आले. पुढचा प्रवास तुमच्यासमोर आहे.