शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते; एकाच ऑलिम्पिकमध्ये ५ 'गोल्ड' जिंकणाऱ्या मुलीची 'मनःशांती की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 17:55 IST

अमेरिकेच्या जलतरणपटूकडून हिंदू धर्माचं तोंडभरुन कौतुक

मोनॅको: एकाच ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदकांची कमाई करणारी जलतरणपटू मिसी फ्रँकलिननं हिंदू धर्माचं कौतुक केलं आहे. हिंदू धर्मग्रंथ वाचून मानसिक शांतता मिळते, असं फ्रँकलिननं म्हटलं. 23 वर्षांच्या फ्रँकलिननं गेल्याच वर्षी निवृत्ती स्वीकारत सर्वांनाच धक्का दिला. खांद्याच्या दुखापतीमुळे निवृत्त होत असल्याचं तिनं सांगितलं होतं. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचं प्रतिनिधीत्व केलेल्या फ्रँकलिननं निवृत्तीनंतर केवळ मनोरंजन म्हणून योग करण्यास सुरुवात केली. त्यातून तिला हिंदू धर्माची माहिती मिळाली. त्यानंतर तिच्या मनात अध्यात्माविषयी ओढ निर्माण झाली. आता ती जॉर्जिया विद्यापीठात धर्माशी संबंधित अभ्यास करत आहे.  लॉरेस विश्व खेल पुरस्कारावेळी फ्रँकलिननं तिच्या धर्माशी संबंधित अभ्यासाची माहिती दिली. 'गेल्या वर्षभरापासून माझा अभ्यास सुरू आहे. हिंदू धर्मग्रंथ वाचून मला मानसिक शांतता आणि समाधान मिळालं. त्यामुळे माझे डोळे उघडले. विविध संस्कृती, त्यासंबंधित माणसं, त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरा याबद्दल वाचन करायला मला आवडतं,' असं तिनं सांगितलं. 'मी ख्रिश्चन धर्माची आहे. मात्र मला हिंदू आणि इस्लाम धर्म जास्त आवडतात. या दोन्ही धर्मांबद्दल मला फारशी माहिती नाही. त्यामुळेच मला दोन्ही धर्मांबद्दल खूप कुतूहल आहे. या धर्मांबद्दल वाचन केल्यानंतर त्यांच्याविषयीची ओढ आणखी वाढली,' असं लंडन ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदकं पटकावणाऱ्या फ्रँकलिननं सांगितलं. फ्रँकलिनची अभ्यासातील प्रगती अतिशय उत्तम आहे. तिला हिंदू धर्माबद्दल खूप माहिती आहे. रामायण आणि महाभारताबद्दल तिला खूप आकर्षण आहे. सध्या ती हे दोन्ही ग्रंथ वाचत आहे. 'त्या महाग्रंथामधल्या गोष्टी मला अविश्वसनीय वाटतात. त्यातील देवांविषयी जाणून घेणं मला खूप आवडतं. या दोन्ही ग्रंथांचं वाचन करण्याचा अनुभव सुंदर आहे. महाभारतातली सर्व नावं माझ्या लक्षात नाहीत. अनेकदा माझा थोडा गोंधळ उडतो. मात्र रामायणातील राम आणि सीतेबद्दल वाचायला मला प्रचंड आवडतं,' असं फ्रँकलिननं सांगितलं.  

टॅग्स :SwimmingपोहणेUSअमेरिकाHinduहिंदूramayanरामायण