शतक हुकल्याची खंत नाही; पण पराभवाचे शल्य : रोहित
By Admin | Updated: April 10, 2015 08:37 IST2015-04-10T01:40:05+5:302015-04-10T08:37:52+5:30
पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवामुळे काहीसा निराश झालेला मुंबई इंडियन्सचा

शतक हुकल्याची खंत नाही; पण पराभवाचे शल्य : रोहित
कोलकाता : पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवामुळे काहीसा
निराश झालेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने शतक हुकल्याची खंत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. कोलकाताचे युवा खेळाडू विजयाचे शिल्पकार ठरले, असेही तो म्हणाला.
केकेआरच्या युवा खेळाडूंना या विजयाचे श्रेय जात असल्याचे सांगून रोहित पुढे म्हणाला, ‘परिस्थितीनुरूप खेळ करणारे केकेआरचे स्थानिक खेळाडू हे संघाची ताकद असल्याचे सिद्ध झाले.’ मुंबईसाठी ९८ धावा ठोकणारा रोहित पुढे म्हणतो, ‘मला शतक हुकल्याची खंत नाही; पण पराभवाचे शल्य आहे. एक गडी बाद केल्यानंतर आम्हाला गोलंदाजीत यश येऊ शकले नाही.’ केकेआरसाठी २० चेंडूंत नाबाद ४६ धावा ठोकणारा मुंबईचा सहकारी सूर्यकुमार यादव याची पाठ थोपटताना रोहित म्हणाला, ‘तो प्रतिभावान खेळाडू आहे. रणजी सामन्याद्वारे त्याने स्वत:ला सिद्ध केले. खेळात तो परिपक्व झाल्याचे काल दिसून आले.’ माझा संघ मुसंडी मारेल, असे संकेत देत आम्ही डावपेचांची योग्य अंमलबजावणी न केल्याने पदरी निराशा आली. याचा दोष कुणालाही देता येणार नाही. हा पहिला सामना होता. गोलंदाजांनी भरपूर मेहनत घेतली; पण यश येऊ शकले नाही. माझा गोलंदाजांवर संपूर्ण विश्वास असल्याने स्पर्धेत परत येऊ, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.