मला तसे म्हणायचे नव्हते - कोहली

By Admin | Updated: March 31, 2017 00:44 IST2017-03-31T00:44:05+5:302017-03-31T00:44:05+5:30

‘धरमशाला कसोटीनंतर मी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. आॅस्ट्रेलियाचे काही क्रिकेटपटू आता मित्र

I did not mean - Kohli | मला तसे म्हणायचे नव्हते - कोहली

मला तसे म्हणायचे नव्हते - कोहली

नवी दिल्ली : ‘धरमशाला कसोटीनंतर मी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. आॅस्ट्रेलियाचे काही क्रिकेटपटू आता मित्र राहिलेले नाहीत, असे म्हणायचे होते. माध्यमांनी विपर्यास करीत संपूर्ण आॅस्ट्रेलियन संघाबाबत माझे वक्तव्य जबाबदार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला’, असा बचावात्मक पवित्रा भारतीय कर्णधार विराट कोहली याने घेतला आहे.
कोहलीचे वक्तव्य आॅस्ट्रेलियन माध्यमांना चांगलेच झोंबले होते. आॅस्ट्रेलियाचे क्रि केटपटू आता माझे मित्र राहिलेले नाहीत, असे थेट विधान करून सर्वांना धक्का दिलेल्या कोहलीने आता सावध पवित्रा घेतला. ‘माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी काही मोजक्या खेळाडूंबद्दल बोललो होतो. आजही अनेक खेळाडूंशी माझे चांगले संबंध आहेत व ते यापुढेही कायम राहतील. आयपीएलमध्ये आम्ही एकत्रच खेळतो,’ असे कोहलीने टिष्ट्वट केले. मालिका जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत कोहलीला स्टीव्ह स्मिथ व आॅस्ट्रेलियन संघ अजूनही तुझे मित्र आहेत का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर कोहलीने स्पष्ट नकार दिला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: I did not mean - Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.