चेन्नई एक्स्प्रेसला हैदराबादचा रेड सिग्नल
By Admin | Updated: May 23, 2014 01:56 IST2014-05-23T01:56:38+5:302014-05-23T01:56:38+5:30
चेन्नई सुपरकिंग्जला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबाद सनरायजर्सविरुद्ध ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला

चेन्नई एक्स्प्रेसला हैदराबादचा रेड सिग्नल
रांची : प्ले आॅफमध्ये याआधीच स्थान निश्चित करणार्या चेन्नई सुपरकिंग्जला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबाद सनरायजर्सविरुद्ध ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. गेल्या दोन सामन्यांत केकेआर आणि बंगळुरूविरुद्ध पराभव स्वीकारणार्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा हा सलग तिसरा पराभव ठरला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, डेव्हिड हसी व सलामीवीर ड्वेन स्मिथ यांची खेळी अखेर व्यर्थच ठरली. सरायजर्स हैदराबाद संघाच्या विजयात डेव्हिड वॉर्नर (९०) आणि कर्णधार शिखर धवन (नाबाद ६४) यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. चेन्नई सुपरकिंग्जने दिलेले १८६ धावांचे लक्ष्य हैदराबाद सनरायजर्सने १९.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्याआधी, कर्णधार महेंद्रसिंग धोनी व डेव्हिड हसी यांनी झळकाविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारली. (वृत्तसंस्था)