शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
2
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
3
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
4
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
5
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
6
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
7
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
8
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
9
भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; RBI गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा, कुणाला दिलं श्रेय?
10
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
11
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
12
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
13
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
14
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
15
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
16
वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!
17
जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
18
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
19
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
20
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

हैदराबादी ‘सनरायझर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 02:48 IST

अप्रतिम माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या नवव्या सत्राचे दिमाखात विजेतेपद पटकावताना बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ८ धावांनी लोळवले.

बंगळुरू : फलंदाजांनी केलेल्या तुफानी हल्ल्यानंतर गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या नवव्या सत्राचे दिमाखात विजेतेपद पटकावताना बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ८ धावांनी लोळवले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून २०८ धावा उभारल्यानंतर बँगलोरला २०० धावांवर रोखले. संघात फारसे नावाजलेले खेळाडू नसताना हैदराबादने संपूर्ण स्पर्धेत सांघिक खेळाच्या जोरावर वर्चस्व राखले. विशेष म्हणजे २००९ व २0११ नंतर पुन्हा एकदा बँगलोरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २०८ धावांचा डोंगर रचला. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली व विध्वंसक फलंदाज ख्रिस गेल यांनी बँगलोरला तुफानी सुरुवात करून दिली. या दोघांचा धडाका पाहता बँगलोर किती षटकांत बाजी मारणार, याची उत्सुकता होती. मात्र, बेन कटिंगने धोकादायक गेलचा बळी मिळवून हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. गेलने केवळ ३८ चेंडंूत ७६ धावांचा तडाखा देताना ४ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली. यानंतर स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणार कोहलीही अर्धशतक झळकावून बाद झाला. कोहलीने ३५ चेंडंूत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा काढल्या. कोहली-गेल यांनी बँगलोरला ११४ धावांची वेगवान सलामी दिली. मात्र, तरीही बँगलोरच्या फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही. धडाकेबाज एबी डिव्हिलियर्सही केवळ ५ धावा काढून परतल्यानंतर बँगलोरच्या फलंदाजीला खिंडारच पडले. यानंतर लोकेश राहुल (११), शेन वॉट्सन (११), सचिन बेबी (१८), स्टुअर्ट बिन्नी (९) असे सर्वच प्रमुख फलंदाज फार काळ टिकू शकले नाही. कटिंगने २ बळी घेतले, तर बरिंदर सरन, मुस्तफिझूर रेहमान व बिपुल शर्मा यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. अखेरच्या ४ षटकांत भुवनेश्वर व मुस्तफिझूर यांनी टिच्चून मारा करताना बँगलोरच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. तत्पूर्वी, कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, तर युवराज सिंग व बेन कटिंग यांनी केलेला तुफानी हल्ला या जोरावर सनरायझर्स हैदराबादने बँगलोरला २०९ धावांचे मजबूत आव्हान दिले. मधल्या षटकात धावगती मंदावल्यानंतर युवराज व कटिंग यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने हिमालय रचला. वॉर्नरने पुन्हा एकदा कॅप्टन इनिंग करताना ३८ चेंडंूत ८ चौकार व ३ षटकारांसह ६९ धावा फटकावल्या. तर, युवराजने २३ चेंडंूत ३८ आणि कटिंगने १५ चेंडंूत नाबाद ३९ धावांचा तडाखा दिला. ख्रिस जॉर्डन (३/४५) व श्रीनाथ अरविंद (२/३०) यांनी हैदराबादला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)‘विराट’ विक्रम एका धावेने हुकला...यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला या वेळी क्रिकेट सम्राट सर डॉन ब्रॅडमन यांचा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी होती. परंतु विराटला एका धावाने हा विक्रम मागे टाकण्यात अपयश आले. १९३० साली झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी ९७४ धावा चोपल्या होत्या, तर यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीने ९७३ धावा फटकावल्या.>‘आयपीएल’चे आतापर्यंतचे विजेतेसनविजेताउपविजेतामोस्ट व्हॅल्युबल प्लेयर२०१६सनरायजर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बँगलोरविराट कोहली२०१५मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्जआंद्रे रसेल२०१४कोलकाता नाईट राईडर्सकिंग्ज इलेव्हन पंजाबग्लेन मॅक्सवेल२०१३मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्जशेन वॉटसन२०१२कोलकाता नाईट राईडर्सचेन्नई सुपर किंग्जसुनील नरेन२०११चेन्नई सुपर किंग्जरॉयल चॅलेंजर्स बंगळूरख्रिस गेल२०१०चेन्नई सुपर किंग्जमुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकर२००९डेक्कन चाजर्सरॉयल चॅलेंजर्स बँगलोरअ‍ॅडम गिलख्रिस्ट२००८राजस्थान रॉयलर्सचेन्नई सुपर किंग्जशेन वॉटसन