११३ धावांवर हैद्राबाद सनरायझर्स सर्व बाद
By Admin | Updated: May 17, 2015 22:00 IST2015-05-17T21:39:40+5:302015-05-17T22:00:11+5:30
शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर प्रविण कुमार चार धावांवर बाद झाला.

११३ धावांवर हैद्राबाद सनरायझर्स सर्व बाद
ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. १७ - नाणेफेक जिंकत सनरायझर्स हैद्राबादने फलंदाजीचा निर्णय घेतला.
सनरायझर्स हैद्राबादने आत्तापर्यंत आयपीएलच्या सामन्यांत सर्वात कमी धावा या सामन्यात केले आहेत. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर प्रविण कुमार चार धावांवर बाद झाला. फलंदाजांपैकी लोकेश राहूलने ने सर्वाधिक म्हणजेच २५ धावा केल्या त्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला फारशी परिणामकारक खेळी करता आली नाही. मिशेल मॅकग्लनने तीन गडी बाद करत हैद्राबादच्या फलंदाजांना रोखले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व इयान मॉर्गन यांना अनुक्रमे फक्त सहा व नऊ धावांत मेकग्लनने बाद केले ,तर भुवनेश्वर कुमारला भोपळा न फोडताच तंबूत परतवले. त्यानंतर लसिथ मलिंगा व जगदिशा सुचिथ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर हरभजन सिंग व कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी एक - एक गडी बाद केला.