हैदराबादचा सात धावांनी विजय
By Admin | Updated: May 7, 2015 20:16 IST2015-05-07T19:50:16+5:302015-05-07T20:16:42+5:30
आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या लढतीत हैदराबादने सात धावांनी विजय मिऴविला. हैदराबादने केलेल्या २० षटकात चार बाद २०१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला अपयश आले. राजस्थान रॉयल्सने २० षटकात सात बाद १९४ धावा केल्या.

हैदराबादचा सात धावांनी विजय
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या लढतीत हैदराबादने सात धावांनी विजय मिऴविला. हैदराबादने केलेल्या २० षटकात चार बाद २०१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला अपयश आले. राजस्थान रॉयल्सने २० षटकात सात बाद १९४ धावा केल्या.
राजस्थानकडून सर्वाधिक धावा स्टीवन स्मिथने केल्या. त्याने ४० चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार लगावत ६८ धावा केल्या. अजिंक्य रहाणे (८), केके नायर (४), दीपक हुड्डा (७), वॉटसन(१२), जेम्स फॉल्कनर (३०), सॅमसन (२१) आणि बिन्नीने नाबाद ३, तर मॉरिसने नाबाद ३४ धावा केल्या.
त्याआधी सनरायझर्स हैदराबादकडून फलंदाज इयान मॉर्गनने सर्वाधिक जास्त धावा काढल्या. त्याने २८ चेंडूत ६३ धावा केल्या. शिखर धवन (५४), वॉर्नर (२४), हेनरिक्स (२०), बोपारा नाबाद १७ आणि ओझाने नाबाद ८ धावा केल्या. तर गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले आणि ईशांत शर्मा, केव्ही शर्मा, हेनरिक्स आणि बोपारा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.