हुसामुद्दिन अंतिम फेरीत
By Admin | Updated: February 26, 2017 23:57 IST2017-02-26T23:57:24+5:302017-02-26T23:57:24+5:30
भारतीय बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दिन याने ५६ किलो गटात स्ट्रांजा स्मृती चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

हुसामुद्दिन अंतिम फेरीत
नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दिन याने ५६ किलो गटात स्ट्रांजा स्मृती चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करणारा एकमेव भारतीय बॉक्सर ठरला. ही स्पर्धा बल्गेरियातील सोफिया येथे सुरू आहे.
हुसामुद्दिन याने उपांत्य फेरीत स्थानिक खेळाडू स्टिफन इवानोव याला पराभूत केले. अंतिम फेरीत त्याचा सामना युक्रेनच्या माइकोलो बुतसेंको याच्याशी होईल. अमित पंघाल याला ४९ किलो गटात उपांत्य फेरीत टिनो बानाबाकोव याच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला गटात मीना कुमारी मेसनाम हिने उपांत्य फेरीत बल्गेरियाच्या स्टेनिमीरा पेत्रोवा हिच्याकडून पराभव स्विकारला या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)