ह्युजच्या कुटुंबाला लोकांची उपस्थिती हवी
By Admin | Updated: December 3, 2014 02:11 IST2014-12-03T02:11:02+5:302014-12-03T02:11:02+5:30
बुधवारी मॅक्सविले हायस्कुलमध्ये फिलिप ह्युजच्या अंत्यसंस्कारात अधिकाधिक लोकांनी श्रद्धांजली अर्पण करावी अशी ह्युजच्या कुटुंबियांची इच्छा आहे.

ह्युजच्या कुटुंबाला लोकांची उपस्थिती हवी
सिडनी : बुधवारी मॅक्सविले हायस्कुलमध्ये फिलिप ह्युजच्या अंत्यसंस्कारात अधिकाधिक लोकांनी श्रद्धांजली अर्पण करावी अशी ह्युजच्या कुटुंबियांची इच्छा आहे. या अंत्यसंस्कारात पाच हजार लोकांच्या उपस्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाला (सीए) न्यू साऊथ वेल्स आणि आॅस्ट्रेलिया संघासहित ३०० ते ४०० अधिकारी आणि खेळाडूंच्या उपस्थितीची शक्यता आहे.
ह्युजचे मॅनेजर जेम्स हँडरसन म्हणाले की, ज्यांना स्कुल भवनमध्ये येणे अशक्य आहे, त्यांच्यासाठी ह्युजच्या कुटुंबियांनी स्कुलबाहेर एकत्रित जमण्याची व्यवस्था केली आहे. ह्युजच्या अंत्यसंस्कारात
सर्वांनी यावे, अशी कुटुंबियांची इच्छा आहे.
अंतिमसंस्कारात ह्युजला गार्ड आॅफ आॅनर दिले जाईल आणि मॅक्सविलेमध्ये अंत्ययात्रा काढण्यात येईल. हँडरसन म्हणाले, बुधवारी सायंकाळी संपूर्ण शहर ह्युजला अखेरचा निरोप देईल. जास्तीत जास्त लोकांनी यावेळी उपस्थित रहावे अशी कुटुंबियांची इच्छा आहे. (वृत्तसंस्था)