व्होजेसचे पदार्पणात शतक

By Admin | Updated: June 6, 2015 01:12 IST2015-06-06T01:12:06+5:302015-06-06T01:12:06+5:30

अ‍ॅडम व्होजेसच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात १७० धावांची आघाडी घेत आपली स्थिती मजबूत केली.

Hughes debut century | व्होजेसचे पदार्पणात शतक

व्होजेसचे पदार्पणात शतक

रोसेयू : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अ‍ॅडम व्होजेसच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात १७० धावांची आघाडी घेत आपली स्थिती मजबूत केली. दरम्यान अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्ट इंडिजने दुसऱ्या सत्रात ५३ षटकांत ३ बाद १४३ धावा अशी मजल मारली होती.
व्होजेसच्या नाबाद १३० धावांच्या बळावर आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या. त्याआधी लेगस्पीनर देवेंद्र बिशू याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजने आॅस्ट्रेलियाची एक वेळ ६ बाद १२६, अशी बिकट स्थिती केली होती.
आॅस्ट्रेलियाच्या अखेरच्या ४ फलंदाजांनी १९२ धावांची भर त्यांच्या धावसंख्येत घातली. बिशूने त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ८० धावांत ६ गडी बाद केले. तो कसोटी क्रिकेटमध्ये ५० गडी बाद करणारा वेस्ट इंडीजचा दुसरा लेगस्पीनर ठरला.
छत्तीस वर्षांचा होणाऱ्या व्होजेसने उशिरा कसोटी पदार्पण केल्यानंतरही शतक ठोकताना वेस्ट इंडीजच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्याने मिशेल जॉन्सनच्या साथीने सातव्या गड्यासाठी ५२ धावांची आणि नाथन लियोन याच्या साथीने नवव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. तसेच अखेरच्या
जोडीसाठी हेजलवूडच्या साथीने
२८.४ षटकांत ९७ धावांची
भागीदारी करताना आॅस्ट्रेलियाला
३०० धावांचा पल्ला पार करून
दिला.
वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळती झाली. त्यांनी २५ धावांतच २ गडी गमावले. यानंतर डॅरेन ब्रावो (५) देखील लगेच परतल्याने त्यांचा डाव ३ बाद ३७ धावा
असा घसरला. यावेळी शेन डोवरीच
व मार्लेन सॅम्युअल्स यांनी
संघाला सावरले. अखेरचे वृत्त
हाती तेव्हा विंडिजने ५३ षटकांत
३ बाद १४३ धावा फटकावल्या होत्या. डोवरीच (नाबाद ४९) आणि सॅम्युअल्स (नाबाद ५४) खेळपट्टीवर टिकून आहेत.
(वृत्तसंस्था)

वेस्ट इंडीज : पहिला डाव १४८. आॅस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर झे. ब्लॅकवूड गो. टेलर ८, शॉन मार्श झे. ब्राव्हो गो. होल्डर १९, स्टीव्ह स्मिथ यष्टि. रामदिन गो. बिशू २५, मायकल क्लार्क झे. रामदिन गो. बिशू १८, अ‍ॅडम व्होजेस नाबाद १३०, शेन वॉटस्न झे. होल्डर गो. बिशू ११, ब्रॅड हॅडिन त्रि. गो. बिशू ८, नाथन लियोन पायचीत गो. गॅब्रियल २२, जोश हेजलवूड त्रि. गो. सॅम्युअल्स ३९, अवांतर : १८, एकूण : १०७ षटकांत सर्वबाद ३१८.
वेस्ट इंडीज : दुसरा डाव : ब्रेथवेट त्रि. गो. स्टार्क १५, एस. होप झे. क्लार्क गो. जॉन्सन २, एस. डोवरिच खेळत आहे ४९, डी. ब्राव्हो खेळत आहे ५४. अवांतर : १८, एकूण : ५३ षटकांत ३ बाद १४३.

Web Title: Hughes debut century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.