लाहोर लॉयन्सवर हफिज नाराज
By Admin | Updated: September 9, 2014 03:18 IST2014-09-09T03:18:38+5:302014-09-09T03:18:38+5:30
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि लाहर सिटी क्रिकेट संघटना (एलसीसीए) यांनी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू मंजुर इलाहीचा मुलगा अली मंजूर याचा लाहोर लॉयन्स संघात समावेश करण्यात आला.
_ns.jpg)
लाहोर लॉयन्सवर हफिज नाराज
कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि लाहर सिटी क्रिकेट संघटना (एलसीसीए) यांनी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू मंजुर इलाहीचा मुलगा अली मंजूर याचा लाहोर लॉयन्स संघात समावेश करण्यात आला. या निर्णयामुळे कर्णधार मोहम्मद हफिज नाराज झाला असल्याचे सूत्रानी म्हटले आहे. हफिजला विश्वासात न घेता या फिरकीपटूचा १५ वा खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे हफिजने नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्राने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)