जिंकायचे कसे?
By Admin | Updated: May 1, 2015 01:33 IST2015-05-01T01:33:58+5:302015-05-01T01:33:58+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना शुक्रवारी आयपीएल-८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार असून, उभय संघांना विजय मिळविण्याची चिंता लागली आहे.

जिंकायचे कसे?
किंग्ज पंजाब- डेअरडेव्हिल्सला चिंता
नवी दिल्ली : मागच्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना शुक्रवारी आयपीएल-८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार असून, उभय संघांना विजय मिळविण्याची चिंता लागली आहे.
फिरोजशाह कोटलावर पराभवाची मालिका दिल्लीने मुंबई इंडियन्सला नमवीत खंडित केली; पण पुढच्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा तब्बल दहा गड्यांनी पराभव केला. विक्रमी १६ कोटी खर्चून खरेदी करण्यात आलेल्या युवराजने दिल्लीसाठी अद्याप कमाल केली नाही. याशिवाय सांघिक खेळीतही हा संघ माघारला आहे. झहीर जखमी असल्याने संघाबाहेर आहे. संघ व्यवस्थापनाने मात्र उद्या तो खेळेल, असे संकेत दिले. सुरुवातीस दिल्लीने काही सामने फार कमी फरकाने गमविल्याचा फटका आता बसतो आहे. कर्णधार जेपी ड्युमिनी आणि श्रेयस अय्यर यांचा अपवाद वगळता मयंक अग्रवाल हा एकमेव फलंदाज दिल्लीसाठी धावा काढू शकला. गोलंदाजीत इम्रान ताहिरने १३ गडी बाद करीत चेन्नई सुपरकिंग्सच्या आशिष नेहरासोबत बरोबरी साधली. (वृत्तसंस्था)
किंग्ज इलेव्हन पंजाब
अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, गुरकिरतसिंग मान, करणवीर सिंंग, मनन वोरा, मिशेल जॉन्सन, परविंदर अवाना, रिषी धवन, संदीप शर्मा, शार्दुल ठाकूर, शॉन मार्श, शिवम शर्मा, तिसारा परेरा, वीरेंद्र सेहवाग, रिद्धिमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक आणि योगेश गोळवलकर.
दिल्ली डेअरडेव्हिल्स
जेपी ड्युमिनी (कर्णधार), युवराज सिंग, मनोज तिवारी, क्विंंटन डीकॉक, इम्रान ताहिर, नाथन कूल्टर नाइल,अँजेलो मॅथ्यूज, गुरिंदर संधू, ट्रॅव्हिस हेड, एल्बी मोर्केल, मार्कस स्टोयनिस, केदार जाधव, मयंक अग्रवाल, अमित मिश्रा, जयदेव उनादकत, झहीर खान, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, जयंत यादव, श्रेयस अय्यर, सी. एम. गौतम, श्रीकर भरत, केके झियास, डोमीनिक मुथुस्वामी.