गोलंदाजांच्या किती चिंधड्या उडवणार ?

By Admin | Updated: February 28, 2015 01:17 IST2015-02-28T01:17:06+5:302015-02-28T01:17:06+5:30

केवळ तीन दिवसांत दुसऱ्यांदा चमत्कार घडला. २४ फेब्रुवारीला विंडीजचा फलंदाज ख्रिस गेल याने २१५ धावा कुटल्या. २७ फेब्रुवारीला द. आफ्रिकेचा

How many sterners to bowl? | गोलंदाजांच्या किती चिंधड्या उडवणार ?

गोलंदाजांच्या किती चिंधड्या उडवणार ?

केवळ तीन दिवसांत दुसऱ्यांदा चमत्कार घडला. २४ फेब्रुवारीला विंडीजचा फलंदाज ख्रिस गेल याने २१५ धावा कुटल्या. २७ फेब्रुवारीला द. आफ्रिकेचा कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स याने केवळ ६६ चेंडू टोलवत १६२ धावांचा पाऊस पाडला. त्याआधी ६४ चेंडूंत १५० धावा ठोकून विश्वचषकात सर्वांत जलद १५० धावा ठोकणारा तो पहिला फलंदाज बनला. खरेतर हा नियमांतील बदलांचा परिणाम आहे. गेलने द्विशतक झळकविले त्यावेळी ‘लोकमत’ने, ‘नियमांच्या बदलांमुळे बॅट झाली धारदार’ या लेखात जे लिहिले ते सत्यात उतरले आहे. नियमांतील बदलांमुळे वन-डे क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ होऊन बसला आहे. गोलंदाज तर बिचारा ‘हतबल’ आणि ‘लाचार’ झाला आहे.
विश्वचषक सुरू होऊन १५ दिवस झाले. या काळात फलंदाजांनी स्वत:ची इतकी दहशत पसरविली की, गोलंदाजांनी धसका घेतला. सर्वच गोलंदाज नाराज आहेत. मागच्या विश्वचषकात एकूण २४ शतकांची नोंद झाली. सध्याच्या विश्वचषकाचा अर्धा टप्पा संपलेला नाही, तोपर्यंत १४ शतके नोंदली गेली. गेल्या विश्वचषकात १५०वर धावांची केवळ दोनदा नोंद झाली; पण सध्याच्या स्पर्धेत अशा धावा तीनदा नोंदल्या गेल्या आहेत.
ख्रिस गेलने विश्वचषकाच्या इतिहासातील पहिले दुहेरी शतकही नोंदवून टाकले. मागील विश्वचषकात ३०० धावांचा पल्ला १७ वेळा गाठला गेला. यंदा आतापर्यंत ३०० च्या वर धावांची नोंद १२ वेळा झाली आहे. फलंदाजांचा हा झंझावात पाहून गोलंदाजांना ‘गोलंदाज वाचवा’ अशी मोहीम राबवावी लागेल!

Web Title: How many sterners to bowl?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.