lionel messi Fan: मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 03:02 PM2022-12-20T15:02:56+5:302022-12-20T15:03:28+5:30

फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून किताब पटकावला.

Hotel owner in Kerala distribute 1500 plates of biryani for free after Lionel Messi's Argentina win FIFA World Cup 2022 final  | lionel messi Fan: मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी

lionel messi Fan: मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी

Next

नवी दिल्ली : फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून किताब पटकावला. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेस मेस्सीचे चाहते जगभर आहेत. मेस्सीचे चाहते भारतातील केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. अशातच मेस्सीच्या संघाच्या विजयानंतर केरळमधील एका हॉटेलचा मालक इतका खूश झाला की त्याने बिर्याणीच्या 1500 प्लेट्स मोफत वाटल्या. खरं तर फिफा विश्वचषक 2022च्या अंतिम सामन्यापूर्वी, हॉटेल मालकाने अर्जेंटिना जिंकल्यास 1,500 प्लेट बिर्याणी मोफत वाटण्याचे आश्वासन दिले होते, जे त्याने पूर्ण केले. 

1500 प्लेट मोफत बिर्याणी
दरम्यान, केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील पल्लिमुला भागातील रॉकलँड हॉटेलचे मालक शिबू हे अर्जेंटिनाचे कट्टर चाहते आहेत. अर्जेंटिनाच्या विजयानिमित्त बिर्याणीच्या 1000 प्लेट्सचे वाटप करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर फ्रान्सविरूद्ध मिळवलेल्या विजयानंतर स्थानिक लोकांनी हॉटेल बाहेर मोठी गर्दी केली. लोक रांगेत उभे राहून बिर्याणीच्या प्लेट्स घेत होती. हॉटेल मालक शिबू यांनी देखील दिलेला शब्द पाळला. त्यांनी केवळ आपला शब्दच पाळला नाही तर मोफत बिर्याणी प्लेट्सची संख्या 500 ने वाढवली. पत्रकारांशी बोलताना शिबू म्हणाले की, एवढ्या पहाटे एवढा मोठा जनसमुदाय जमेल अशी मला अपेक्षा नव्हती.

"शिबू यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, "मी मोफत बिर्याणी प्लेट्सची संख्या 500 ने वाढवली आहे." तिथे उपस्थित असलेले काँग्रेसचे आमदार शफी पारंबिल यांनी पत्रकारांना सांगितले की, अर्जेंटिनाचे चाहते गेली 36 वर्षे या विजयाची वाट पाहत होते. त्यामुळे 36 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. 

मेस्सीचा भारतातील जबरा फॅन 
मेस्सीचे जेवढे वय आहे त्याहून अधिक वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत आहोत. अर्जेंटिना हरला तेव्हाही आम्ही त्यांचे समर्थक होतो आणि आता जिंकल्यावरही आम्ही त्यांचे चाहते आहोत. तीन दशकांहून अधिक प्रदीर्घ प्रतीक्षेचा शेवट आपण मोफत बिर्याणी वाटून साजरा करत असल्याचे शिबू यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: Hotel owner in Kerala distribute 1500 plates of biryani for free after Lionel Messi's Argentina win FIFA World Cup 2022 final 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.