बिर्याणी वादानंतर धोनीने सोडले हॉटेल
By Admin | Updated: September 20, 2014 01:45 IST2014-09-20T01:45:19+5:302014-09-20T01:45:19+5:30
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या काही सदस्यांनी रागाच्या भरात हैदराबादमध्ये एक पंचतारांकित हॉटेल सोडणोच पसंत केले.

बिर्याणी वादानंतर धोनीने सोडले हॉटेल
हैदराबाद : भारतीय फलंदाज अंबाती रायडू याच्या घरून आलेल्या बिर्याणीला हॉटेलमध्ये खाण्यास हॉटेलव्यवस्थापनाने परवानगी दिली नाही, म्हणून भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या काही सदस्यांनी रागाच्या भरात हैदराबादमध्ये एक पंचतारांकित हॉटेल सोडणोच पसंत केले.
मंगळवारी धोनी आणि त्याच्या सहका:यांना रायडू याच्या घरून आलेली बिर्याणी खाण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे धोनीसह नाराज झालेल्या व्यवस्थापनाने हॉटेलचे बुकिंग रद्द केली. त्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दुस:या हॉटेलमध्ये रवाना झाले.
रायडू मुंबईकडून रायपूर येथे खेळत होता आणि त्यांच्या सांगण्यावरून त्याच्या परिवाराने हॉटेलमध्ये बिर्याणी पाठविली होती. मात्र, हैदराबाद येथील या हॉटेलमध्ये बाहेरून आणलेल्या जेवणास परवानगी दिली जात नाही. त्यांचा हा कडक नियम आहे. हॉटेलने खेळाडूंना त्यांच्या रूमवर बिर्याणी खाण्यास परवानगी दिली होती. मात्र, धोनीने बोर्ड रूममध्ये बिर्याणी खाण्याचा हट्ट केला. मात्र, धोनीच्या या हट्टीपणाचा काही फायदा झाला नाही. हॉटेलने स्पष्ट नकार दिला. यावरून धोनीने हॉटेल सोडण्याचा निर्णय घेतला.