शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

FIFA World Cup 2022 Final: Messi, Mbappe च्या आधी फायनलमध्ये दिसणार Nora Fatehi चा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 10:38 IST

आज मेस्सीची अर्जेंटिना आणि एमबाप्पेच्या फ्रान्समध्ये विजेतेपदाची लढत, Closing Ceremony मध्ये कोण-कोण दिसणार, वाचा सविस्तर

Nora Fatehi | कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या FIFA World Cup 2022 चा अंतिम सामना आज रात्री खेळवला जाणार आहे. या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना भिडणार आहेत. आजचा हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक असेल यात दुमत नाही. कारण या सामन्यात कायलिन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू झुंजताना दिसणार आहेत. यात विशेष म्हणजे अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभही (Closing Ceremony) होणार आहे. दिमाखदार स्पर्धेसोबतच या समारोप सोहळ्याचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. भारतीय अभिनेत्री आणि स्टार डान्सर नोरा फतेही समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे. चला जाणून घेऊया FIFA विश्वचषक 2022 च्या समारोप समारंभात कधी, कुठे आणि कोण परफॉर्म करणार आहे?

समारोप समारंभ कधी आणि किती वाजता सुरू होईल?

फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील सामन्यापूर्वी समारोप समारंभ होणार आहे. हा समारोप सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. समारोपाचा सोहळा अर्धा तास रंगण्याची शक्यता आहे. १८ डिसेंबर हा कतारचा राष्ट्रीय दिवस देखील आहे, अशा परिस्थितीत चांगले परफॉमन्स होतील असा कतारवासीयांना विश्वास आहे.

कुठे होणार समारोप समारंभ?

समारोप समारंभ आणि अंतिम सामना दोन्ही लुसेल स्टेडियमवर होणार आहेत. लुसेल स्टेडियम हे कतारमधील सर्वात मोठे स्टेडियम आहे आणि त्याची क्षमता सुमारे ८९ हजार प्रेक्षकांची आहे.

समारोप समारंभ कुठे पाहू शकाल?

फिफा विश्वचषकाचा समारोप समारंभ भारतात Sports 18 आणि Sports 18 HD वर प्रसारित केला जाईल. JioCinema App आणि वेबसाइटवरही समारोप समारंभाचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

समारोप समारंभात कोण-कोण?

फिफाने अद्याप समारोप समारंभासाठी कलाकारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. भारतीय अभिनेत्री नोरा फतेही या कार्यक्रमात परफॉर्म करणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच, नायजेरियन-अमेरिकन संगीतकार डेव्हिडो देखील कार्यक्रमात वर्ल्ड कप 2022 थीम सॉन्ग (हया-हया) सादर करणार आहे. पोर्तो रिकन सिगार ओझुना आणि काँगोलीज-फ्रेंच रॅपर गिम्स यांनीही समारोप समारंभास उपस्थित राहण्याची पुष्टी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेझ आणि शकीरा वर्ल्ड कप फायनलसाठी एका म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसणार आहेत.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Nora fatehiनोरा फतेहीLionel Messiलिओनेल मेस्सी