यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या हव्यात
By Admin | Updated: November 4, 2015 01:37 IST2015-11-04T01:37:04+5:302015-11-04T01:37:04+5:30
वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीबाबत झालेला वाद आता इतिहास असून यजमान संघ स्वत:ला अनुकूल खेळपट्ट्या तयार करतात आणि यात लपविण्यासारखे काही नाही, असे

यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या हव्यात
मोहाली : वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीबाबत झालेला वाद आता इतिहास असून यजमान संघ स्वत:ला अनुकूल खेळपट्ट्या तयार करतात आणि यात लपविण्यासारखे काही नाही, असे टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
भारतीय संघ ५ नोव्हेंबरपासून जगातील अव्वल कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. शास्त्री म्हणाले, ‘या मालिकेच्या निमित्ताने चुरस अनुभवायला मिळेल.’
पीसीए स्टेडियममध्ये बोलताना शास्त्री म्हणाले,‘यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या मिळायला हव्यात. यात लपविण्यासारखे काही नाही. वर्षानुवर्षे असेच चालत असून आपल्या देशात आपण याची अपेक्षा करायला हवी. दक्षिण आफ्रिका किंवा आॅस्ट्रेलियात खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून चेंडू वळत नाही, येथे काय होते हे बघावे लागेल. दक्षिण आफ्रिका संघ फॉर्मात असून गेल्या १० वर्षांतील ही सर्वोत्तम मालिका होईल.’ शास्त्री पुढे म्हणाले की, कोहली बऱ्याच दिवसांपासून कसोटी कर्णधारपद सांभाळत आहे. श्रीलंकेत मालिका विजय मिळविल्यामुळे कोहली कर्णधार म्हणून परिपक्व होत असल्याची प्रचिती येते. (वृत्तसंस्था)
रविचंद्रन आश्विन ठणठणीत असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे. आश्विन चांगली गोलंदाज करीत आहे. आमच्या संघात अन्य दोन फिरकीपटू असून, पाहुणा संघ जर केवळ आश्विनवर लक्ष देणार असेल, तर अन्य दोन फिरकीपटू त्यांच्यापुढे अडचण निर्माण करू शकतात, हे विसरता येणार नाही.
- रवी शास्त्री