भारत-पाक मालिकेच्या आशा कायम : शुक्ला
By Admin | Updated: November 16, 2015 02:45 IST2015-11-16T02:45:37+5:302015-11-16T02:45:37+5:30
भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान डिसेंबरमध्ये क्रिकेट मालिकेच्या आयोजनाच्या आशा अद्याप कायम असल्याचे मत इंडियन प्रीमियर लीगचे कमिशनर

भारत-पाक मालिकेच्या आशा कायम : शुक्ला
कानपूर : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान डिसेंबरमध्ये क्रिकेट मालिकेच्या आयोजनाच्या आशा अद्याप कायम असल्याचे मत इंडियन प्रीमियर लीगचे कमिशनर व उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (यूपीसीए) सचिव राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय मंत्री शुक्ला पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिकेच्या आयोजनाबाबतचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पाठविलेला आहे. बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारला आणि सरकारने मालिका आयोजनासाठी सहमती दर्शवली तर या दोन शेजारी राष्ट्रांच्या संघांदरम्यान क्रिकेट मालिकेचे आयोजन शक्य आहे.’ आयपीएलचे कमिशनर म्हणाले, ‘माझ्या मते, या मालिकेच्या आयोजनाच्या आशा अद्याप कायम आहेत.’ यापूर्वी पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी अलीकडेच भारताचा दौरा केला होता. त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबत मालिकेच्या आयोजनाबाबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)