होळकर स्टेडियम भारतासाठी लकी

By Admin | Updated: October 12, 2015 23:54 IST2015-10-12T23:54:44+5:302015-10-12T23:54:44+5:30

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना बुधवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे.

Holkar Stadium Lucky for India | होळकर स्टेडियम भारतासाठी लकी

होळकर स्टेडियम भारतासाठी लकी

इंदूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना बुधवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. हे स्टेडियम यजमान संघासाठी खूपच लकी ठरले असून, येथे भारताने खेळलेले तीनही सामने जिंकले आहेत.
२७ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या होळकर स्टेडियममध्ये चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. इंदूरमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला नमवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करील. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघ पहिल्यांदाच इंदूरमध्ये खेळणार आहे. या स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना १५ एप्रिल २00६ रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडला ७ विकेट्सनी हरविले होते. होळकर स्टेडियमवर १७ नोव्हेंबर २00८ रोजी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला ५४ धावांनी हरविले. ८ डिसेंबर २0११ रोजी झालेल्या या सामन्यात भारताने विंडीजला १५३ धावांनी हरविले होते. भारताने या स्टेडियमवर आतापर्यंत खेळले गेलेल्या सामन्यात अनुक्रमे २८९, २९२ आणि ४१८ अशा धावा बनविल्या आहेत.

Web Title: Holkar Stadium Lucky for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.