हॉकी वर्ल्ड लीग फायनल, भारताचा ग्रेट ब्रिटनवर विजय
By Admin | Updated: December 3, 2015 20:51 IST2015-12-03T20:43:45+5:302015-12-03T20:51:20+5:30
हॉकी वर्ल्ड लीग फायनलच्या उपांत्यपुर्व फेरीत आज भारताने ग्रेट ब्रिटेनचा २-१ ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

हॉकी वर्ल्ड लीग फायनल, भारताचा ग्रेट ब्रिटनवर विजय
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. ३ - हॉकी वर्ल्ड लीग फायनलच्या उपांत्यपुर्व फेरीत आज भारताने ग्रेट ब्रिटेनचा २-१ ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. योग्य वेळी आपला खेळ उंचावत भारताने या स्पर्धेत अजिंक्य असनाऱ्या ग्रेट ब्रिटनचा पराभव केला.
साखळी सामन्यांतील निराशजनक कामगिरीनंतर भारताची ही नव्याने सुरवात आहे, साखळी मध्ये भारताला एकही विजय मिळवता आला नव्हता, दखल घेण्याची बाब म्हणजे स्पर्धेच्या नविन रचनेमुळे गटात तळाला असूनही भारत बाद फेरीत प्रवेश करु शकला. या स्पर्धेतील भारताचा हा पहिला विजय आहे. यापुर्वी दोन पराभव आणि एक बरोबरी करत भारत उपांत्यपुर्व फेरीत पोहचला होता. ब गटात भारत तळाशी होता तर ग्रेट ब्रिटेन अव्वल त्यामुळे हा विजय महत्वाचा आहे. १९८० नंतर भारताने प्रथमच ग्रेट ब्रिटनचा पराभव केला आहे. उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला बेल्जियम आणि अर्जेंटीना यांच्यामधील उपांत्यपुर्व सामन्यातील विजेत्याशी होईल.