३६ वर्षांनंतर इतिहास रचण्यास हॉकी संघ सज्ज
By Admin | Updated: August 4, 2016 20:25 IST2016-08-04T20:25:35+5:302016-08-04T20:25:35+5:30
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ ३६ वर्षांनंतर रिओ आॅलिम्पिकमध्ये नवीन इतिहास रचण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवणार आहे.

३६ वर्षांनंतर इतिहास रचण्यास हॉकी संघ सज्ज
ऑनलाइन लोकमत
रियो डी जेनेरो, दि. ४ : भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ ३६ वर्षांनंतर रिओ आॅलिम्पिकमध्ये नवीन इतिहास रचण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवणार आहे. पुरुष संघाने याआधीचे आॅलिम्पिक पदक १९८0 मॉस्को आॅलिम्पिकमध्ये जिंकले होते. तसेच महिला हॉकी संघही अखेरच्या वेळी आॅलिम्पिकमध्ये मॉस्को येथेच खेळला होता.
रियोत भारताची सलामीची लढत शनिवारी आयर्लंड संघाविरुद्ध होणार आहे. जूनमध्ये स्पेनमध्ये झालेल्या सहा देशांच्या स्पर्धेत आयर्लंडवरील मिळालेल्या विजयाने भारताचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. संघाचा कर्णधार पी.आर. श्रीजेशने म्हटले, ह्यआयर्लंडच्या खेळाडूंनी युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यांच्याविषयी आधीच अंदाज लावणे कठीण आहे. मैदानात चेंडूंवर त्यांची पकड मजबूत आहे. ही लढत सोपी नसून आम्हाला सर्वस्व पणाला लावण्याची आवश्यकता आहे. खेळाच्या या महाकुंभात मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल याविषयी मला कधीही आशा नव्हती. माझे उद्दिष्ट आपल्या देशासाठी पदक जिंकून ३६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचा आहे.
श्रीजेश म्हणाला, ह्यमाझे पहिले काम हे गोल वाचवणे आहे आणि दुसरे काम संघाला एकजूट करून चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. तिसरे काम हे एक गोलरक्षक म्हणून संघात आत्मविश्वास निर्माण करणे हे आहे. हे तिन्ही काम एक कर्णधार करू शकतो, असे मला वाटते आणि त्यामुळे माझ्यावर याचे कोणतेही अतिरिक्त दडपण नाही. सर्वच खेळाडूंना दबावाशिवाय आपला स्वाभाविक खेळ करण्याची आवश्यकता आहे.ह्ण
२000 मध्ये सिडनीत अर्जेंटिनाला ३-0 असे नमवल्यानंतर भारताने आतापर्यंत आॅलिम्पिकचा सलामीचा सामना जिंकला नाही. संघाला २00४ मध्ये अॅथेन्स आॅलिम्पिक आणि २0१२ च्या लंडन आॅलम्पिकमध्ये हॉलंडकडून अनुक्रमे १-३ आणि २-३ असा पराभव पत्करावा लागला होता.
जागतिक क्रमवारीतल पाचव्या क्रमांकावरील भारतीय संघाचे लक्ष्य हे ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे असणार आहे. दुसरीकडे १९0८ नंतर प्रथमच आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आयर्लंडचा संघ ही लढत जिंकून आपले पुनरागमन संस्मरणीय करण्याच्या निर्धाराने खेळेल. भारतीय संघाची व्यूहरचना आयर्लंडचा मार्की खेळाडू मिश डार्लिंगसह गोलरक्षक आणि कर्णधार डेव्हिड हार्टे यांच्यावर प्रामुख्याने केंद्रित असेल.
दुसरीकडे १९८0 नंतर आॅलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी होणाऱ्या भारतीय महिला संघाची लढत रविवारी जपानविरुद्ध होणार आहे. गेल्या वर्षी भारताने विश्व हॉकी लीगमध्ये जपानला पराभवाची चव चाखावी लावली होती. त्यामुळे भारतीय संघ अनुभवी डिफेंडर सुशीला चानू हिच्या नेतृत्वाखाली आत्मविश्वासाने मैदानात पाऊल ठेवेल.
जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असणाऱ्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक नील हॉवगूड म्हणाले, संघातील खेळाडू आपल्या पहिल्या आॅलिम्पिक स्पर्धेविषयी उत्साहित आहेत. अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती आणि तेथे आम्ही काही सामनेदेखील जिंकले. तेथील कामगिरीमुळे मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही आॅलिम्पिकमध्ये कामगिरी उंचावण्याचा पूर्ण प्रयत्न करू.ह्ण
संघाची कर्णधार सुशीला चानू हिने म्हटले, ह्यही आमची पहिली आॅलिम्पिक स्पर्धा आहे आणि आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू इच्छितो. जपानविरुद्ध आम्ही याआधीही चांगली कामगिरी केली आणि येथेदेखील यश आम्हालाच मिळेल. प्रशिक्षकांशी विचार विनिमियाद्वारे निश्चित झालेल्या व्यूहरचनेनुसार आम्ही कामगिरी करू.