हॉकीपटू गुरबाजसिंह निलंबित

By Admin | Updated: August 11, 2015 00:38 IST2015-08-11T00:38:00+5:302015-08-11T00:38:00+5:30

भारताचा सिनियर हॉकीपटू गुरबाजसिंहला संघातील गटबाजीत सहभागी झाल्यामुळे सोमवारी नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

Hockey player Gujarsingh suspended | हॉकीपटू गुरबाजसिंह निलंबित

हॉकीपटू गुरबाजसिंह निलंबित

नवी दिल्ली : भारताचा सिनियर हॉकीपटू गुरबाजसिंहला संघातील गटबाजीत सहभागी झाल्यामुळे सोमवारी नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
यामुळे या अनुभवी मिडफिल्डरचे रियो आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. हरबिंदरसिंहच्या नेतृत्वाखालील हॉकी इंडियाच्या शिस्तपालन समितीने आज या गुरबाजसह माजी भारतीय प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्यासोबतच्या बैठकीनंतर गुरबाजसिंहला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. फेलिक्सने गेल्या महिन्यात एंटवर्पमध्ये हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीनंतर त्यांच्या अहवालात गुरबाजवर आरोप ठेवले होते. गुरबाजजवळ एका महिन्याच्या आत अपील करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Hockey player Gujarsingh suspended