शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का?; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:42 IST

भारतीय पुरुष व महिला हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर प्रथमच ऑलिम्पिक पदक पटकावले.

भारतीय पुरुष व महिला हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर प्रथमच ऑलिम्पिक पदक पटकावले. भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४, १९८० मध्ये सुवर्णपद,  १९६०मध्ये रौप्य आणि १९६८, १९७२, २०२१मध्ये कांस्य अशी एकूण १२ पदकं नावावर केली आहेत. 

हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे का?युवक कल्याण व क्रीडा खात्याचे केंद्रीय मंत्र्यानी केंद्रानं अजून कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ असे जाहीर केलेले नाही. धुळ्यातील एका शिक्षकानं दाखल केलेल्या RTIवर मंत्रालयाकडून हे उत्तर मिळाले आहे. मयुरेश अग्रवाल यांनी दाखल केलेल्या RTIमध्ये हॉकीला केव्हा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळेल, असे विचारले गेले होते. त्यावर सरकारने कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर केलेले नाही. सरकारला सर्व खेळांचा प्रसार करायचा आहे, असे उत्तर मिळाले.  हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

ओडिशाचे मुख्यमंत्री काय म्हणतात?२०१३पासून ओडिशा सरकार हॉकीला प्रमोट करत आहे. २०१३मध्ये हॉकी इंडिया लीग खेळवण्यात आली तेव्हा ओदिशा राज्यातील दोन व्यावसायिकांनी कलिंगा लँसर्स फ्रँचायझी खरेदी केली. २०१४मध्ये ओदिशा सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २०१७ हॉकी वर्ल्ड लीग आणि २०१८ हॉकी वर्ल्ड कप येथे झाला होता. २०२३ चा हॉकी वर्ल्डकपही येथे आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. व्हायरल झालेल्या पत्रात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :HockeyहॉकीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021