शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 23:41 IST

भारताकडून शिवानंद लाक्रा (२६ आणि २९ व्या मिनिटाला) याने दोन गोल केले.

 जोहोर बारू (मलेशिया) : भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाने बुधवारी ऑस्ट्रेलियाचा ५-१ ने पराभव करीत नवव्या सुलतान आॅफ जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली.भारताकडून शिवानंद लाक्रा (२६ आणि २९ व्या मिनिटाला) याने दोन गोल केले, तर दिलप्रीतसिंग (४४), गुरसाहिबजीत सिंग (४८) आणि मनदीप मोर (५०) यांनी प्रत्येकी एक गोल केला. ऑस्ट्रेलियाच्या चुकीमुळे भारताला पहिल्याच मिनिटाला गोल नोंदविण्याची संधी मिळाली होती. पण रॉबर्ट मॅक्मिलन याने तत्परता दाखवून साहिबजीतचा प्रयत्न हाणून पाडला.यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये बराच वेळ मिडफिल्डमध्ये खेळ झाला. ऑस्ट्रेलियाला आठव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोल होऊ शकला नाही. भारताने गोलरक्षक प्रशांत चौहान याला मैदानात आणले. याचवेळी ऑस्ट्रेलियाने हल्ला चढविला. मायकेल फ्रान्सिसने चेंडू गोलजाळीच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केला होता, पण चौहान याने हा हल्ला शिताफीने परतवून लावला. काही मिनिटानंतर भारतालाही पेनल्टी कॉर्नर मिळाला होता; पण गुरसाहिबजीतला त्यावर गोल नोंदविण्यात अपयश आले.भारताने यानंतर लाक्राच्या गोलमुळे आघाडी मिळवली. दिलप्रीतच्या शानदार पासपुढे ऑस्ट्रेलिया बचाव तोकडा पडला. याचा लाभ घेत लाक्राने चेंडू अलगद गोलजाळीत ढकलला. दिलप्रीत आणि लाक्रा यांच्या जोडीने यानंतरही अनेकदा हल्ले चढविले. त्यात लाक्राला दुसरा गोल नोंदविण्यात यश आल्याने मध्यंतराला भारताकडे २-० अशी आघाडी होती.भारताने अखेरच्या दोन क्वॉर्टरमध्ये आॅसीला दडपणात आणून आणखी ३ गोल केले. ऑस्ट्रेलियाला यादरम्यान खाते उघडण्यात यश आले. भारताला अखेरचा राऊंड रॉबिन सामना शुक्रवारी ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळायचा आहे.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलिया