हॉकी : सराव सामन्यात भारताचा स्पेनवर विजय
By Admin | Updated: August 3, 2016 04:14 IST2016-08-03T04:14:41+5:302016-08-03T04:14:41+5:30
आकाशदीपने नोंदविलेला मैदानी गोल आणि रुपिंदरपालसिंग याने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविलेल्या गोलमुळे भारताने आॅलिम्पिक हॉकी सराव सामन्यात मंगळवारी स्पेनचा २-१ ने पराभव केला.

हॉकी : सराव सामन्यात भारताचा स्पेनवर विजय
रिओ : आकाशदीपने नोंदविलेला मैदानी गोल आणि रुपिंदरपालसिंग याने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविलेल्या गोलमुळे भारताने आॅलिम्पिक हॉकी सराव सामन्यात मंगळवारी स्पेनचा २-१ ने पराभव केला.
शनिवारी आयर्लंडविरुद्ध सामना खेळून भारताला मोहीम सुरू करायची आहे. त्याआधी आणखी एक सराव सामना खेळण्याची संधी राहील. कर्णधार पी. आर. श्रीजेश म्हणाला,‘ ब्राझीलमध्ये येण्याआधी आम्ही माद्रिदमध्ये स्पेनकडून पराभूत झालो होतो. पण आज येथे विजयी झाल्याने स्पर्धेपूर्वीचे हे शुभसंकेत मानायला हवेत.
स्पेनमध्ये उकाडा होता. आम्ही बेंगळुरुच्या थंड हवामानातून स्पेनमध्ये गेलो होतो. गर्मी आणि उकाड्यामुळे सामना गमविण्याची वेळ आली. माद्रिदमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस इतके होते. रिओत स्पेनच्या तुलनेत हवामान फारच छान असल्याने येथे विजयासाठी घाम गाळावा लागला नाही.’ दरम्यान अन्य एका सामन्यात आॅस्ट्रेलियाने जर्मनीचा ५-२ ने धुव्वा उडविला. (वृत्तसंस्था)