हॉकी प्रशिक्षकपदी रोएलंट ओल्टमन्स

By Admin | Updated: July 26, 2015 01:55 IST2015-07-26T01:55:33+5:302015-07-26T01:55:33+5:30

भारतीय हॉकी संघाच्या कोचपदावरून पॉल वॅन ऐस यांची हकालपट्टी झाल्याने संघाचे हाय परफॉर्ममन्स संचालक रोएलंट ओल्टमन्स यांच्याकडे रियो आॅलिम्पिकपर्यंत

Hockey Coach Roelant Oltmans | हॉकी प्रशिक्षकपदी रोएलंट ओल्टमन्स

हॉकी प्रशिक्षकपदी रोएलंट ओल्टमन्स

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाच्या कोचपदावरून पॉल वॅन ऐस यांची हकालपट्टी झाल्याने संघाचे हाय परफॉर्ममन्स संचालक रोएलंट ओल्टमन्स यांच्याकडे रियो आॅलिम्पिकपर्यंत प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविण्यात आली.
हॉकी इंडियाच्या नऊ सदस्यीय समितीने शुक्रवारी पॉल वॅन यांना पदावरुन दूर सारण्याची शिफारस हॉकी इंडियाकडे केली. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि साईचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीनंतर ६१ वर्षांचे ओल्टमन्स यांना पुरुष हॉकी संघाच्या कोचपदाचा प्रभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पत्रकारांना ही माहिती देताना बत्रा म्हणाले,‘ रियो आॅलिम्पिकपर्यंत कोच बनण्यास ओल्टमन्स यांनी होकार कळविला आहे. त्यानंतरही त्यांनी कोचपदी रहावे, अशी आमची इच्छा आहे.’ एन्टवर्प येथे वर्ल्ड हॉकी लीगच्या मलेशियाविरुद्धच्या क्वॉर्टरफायनलमध्ये बत्रा यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीचा फटका वॉन ऐस यांना बसला आहे. वॉन यांनी सोमवादी दावा केला की बत्रा यांनी त्यांना निलंबित केले आहे. ओल्टमन्स यांनीच मला ई-मेलवर ही माहिती दिल्याचा दावा वॉन यांनी केला होता. बत्रा पुढे म्हणाले,‘ कोच येतील व जातील पण संघाला पुढे जायचेच आहे. आॅलिम्पिकसाठी संघ सज्ज करायचा आहे. ओल्टमन्स भारतीय संघासोबत तीन वर्षांपासून आहेत आणि खेळाडूंसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. त्यांच्या नियुक्तीसोबतच कोच पदाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली. राष्ट्रीय शिबिर सुरू झाले आहे. कोचविना सराव करण्याची वेळ खेळाडूंवर येणार नाही. भारतीय कोचला हटविण्याची पाच वर्षांतील ही चौथी वेळ आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Hockey Coach Roelant Oltmans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.