शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सायकलपटूंची ऐतिहासिक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 23:22 IST

पहिल्यांदाच मिळवला जागतिक स्पर्धेत प्रवेश

मुंबई : भारताच्या सायकलपटूंनी गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली. या शानदार कामगिरीमुळे आता जगातील अव्वल १८ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा समावेश होईल.एसो एलबेन (१९ वर्षीय), जेम्स सिंग (१९), रोजित सिंग (१८) आणि रोनाल्डो सिंग (१८) या युवा सायकलपटूंचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने गुरुवारी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) ट्रॅक सायकलिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली. ही स्पर्धा जर्मनीची राजधानी बर्लिन येथे २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीमध्ये रंगेल. दरम्यान, जागतिक स्पर्धेत भारतीय पुरुष जरी पहिल्यांदाच सहभागी होणार असले, तरी याआधीच या स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकलेला आहे.याआधी २०१६ साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताची महिला सायकलपटू देबोराह हेरॉल्ड हिने महिलांच्या ५०० मीटर अंतराच्या चाचणी स्पर्धेतून पात्रता मिळवली होती. यानंतर भारताचा या स्पर्धेत दुसºयांदा, तर सांघिक गटात पहिल्यांदाच समावेश होईल. विशेष म्हणजे आगामी टोकियो ऑलिम्पिक तिकीट मिळविण्यासाठी या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे ठरणार असल्याने भारतीयांसाठी ही स्पर्धा मोठी संधी ठरू शकते.त्याचवेळी, भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक आर. के. शर्मा यांनी मात्र आमचे लक्ष्य २०२४ सालची ऑलिम्पिक स्पर्धा असून जागतिक स्पर्धेतील प्रवेश त्यादृष्टीने टाकलेले पहिले मोठे पाऊल असल्याचे सांगितले. शर्मा यांनी सांगितले, ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मिळविलेली पात्रता युवा खेळाडूंनी मिळविलेले खूप मोठे यश आहे. या स्पर्धेत आणि यंदाच्या वर्षात संघाची एकूण कामगिरी कशी होणार याविषयी आम्हाला कोणतीच चिंता नाही. आमचे मुख्य लक्ष्य २०२४ सालच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे असून, त्यादृष्टीने आमचे भक्कम पाऊल पडले आहे.’

टॅग्स :CyclingसायकलिंगIndiaभारत