हेराथमुळे टीम इंडियाचे ‘हे राम’

By Admin | Updated: August 15, 2015 23:53 IST2015-08-15T23:53:59+5:302015-08-15T23:53:59+5:30

पहिल्या तीन दिवसांमध्ये वर्चस्व राखून सामना आपल्या बाजूने झुकवल्यानंतरही फलंदाजांनी केलेल्या हाराकीरीमुळे भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी

Herath, Team India's 'Hey Ram' | हेराथमुळे टीम इंडियाचे ‘हे राम’

हेराथमुळे टीम इंडियाचे ‘हे राम’

गॅले : पहिल्या तीन दिवसांमध्ये वर्चस्व राखून सामना आपल्या बाजूने झुकवल्यानंतरही फलंदाजांनी केलेल्या हाराकीरीमुळे भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी निराशाजनक हार पत्करावी लागली. श्रीलंकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतले आहे. दुसऱ्या डावात निर्णायक नाबाद दिडशतक झळकावून संघाला विजयी करणाऱ्या दिनेश चंडीमलला सामनावीर म्हणून घोषित केले. तर लंकेच्या रंगना हेराथने ७ गडी बाद करताना भारतीयांचे कंबरडे मोडले. १७६ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव ११२ धावांत ढेपाळला.
नाइट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या इशांत शर्माच्या रुपाने हेराथने भारताला चौथ्या दिवशी पहिला झटका दिला. २ बाद ३० अशा अवस्थेतून सावरत असतानाच हेराथने फॉर्मशी झगडत असलेल्या रोहित शर्माचा त्रिफळा उडवताना भारताला मोठा धक्का दिला. रोहितने २३ चेंडूचा सामना करताना केवळ १० धावा काढल्या. यानंतर लगेच थरींदू कौशलने कर्णधार विराट कोहलीला (३) बाद केले आणि नंतर १५ धावांच्या अंतराने सलामीवीर शिखर धवनचा (२८) स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेऊन संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. अर्धा संघ ६० धावांमध्ये बाद झालेला असतानाच भारताच्या पराभवाची चाहूल लागली. यानंतर वृध्दिमान साहा (२), हरभजन सिंग (१) आणि आर. अश्विन (३) हेराथचे शिकार ठरल्याने भारताची ८ बाद ८१ धावा अशी केविलवाणी अवस्था झालेली. यावेळी सर्वांच्या नजरा होत्या त्या दुसऱ्या टोकावरुन झुंजारपणे खेळणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीकडे. त्याने संघाकडून सर्वाधिक ३६ धावांची झुंजार खेळी केली. मात्र इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्याने त्याची झुंज अपयशीच ठरली. (वृत्तसंस्था)


धावफलक ....
श्रीलंका : पहिला डाव - सर्वबाद १८३ धावा आणि दुसरा डाव - सर्वबाद ३६७ धावा. भारत : पहिला डाव - सर्वबाद ३७५ धावा. आणि दुसरा डाव - राहूल पायचीत गो. हेराथ ५, धवन झे. व गो. कौशल २८, इशांत शर्मा पायचीत गो. हेराथ १०, रोहित शर्मा त्रि. गो. हेराथ ४, विराट झेल सिल्वा गो. कौशल ३, अजिंक्य रहाणे झे. मॅथ्यूज गो. हेराथ ३६, साहा यष्टीचीत चंडिमल गो. हेराथ २, हरभजन सिंग झे. सिल्वा गो. हेराथ १, अश्विन झे. प्रसाद गो. हेराथ ३, मिश्रा झे. करुणारत्ने गो. कौशल १५, वरुण अ‍ॅरोन नाबाद १. अवांतर - ४. एकूण : सर्वबाद ११२ धावा. गोलंदाजी : धम्मीका प्रसाद ४-२-४-०; रंगना हेराथ २१-६-४८-७; थरींदू कौशल १७.५-१-४७-३; नुवान प्रदीप ६-३-८-०; अँजेलो मॅथ्यूज १-०-३-०.

Web Title: Herath, Team India's 'Hey Ram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.