विराटकडून आधी प्रेमाची कबुली, नंतर माघार
By Admin | Updated: February 15, 2017 14:36 IST2017-02-15T13:56:41+5:302017-02-15T14:36:13+5:30
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूडची फिल्लोरी हिरोईन अनुष्का शर्मा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

विराटकडून आधी प्रेमाची कबुली, नंतर माघार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूडची फिल्लोरी हिरोईन अनुष्का शर्मा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातमीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले आहे. ट्विटरवर प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर विराटने मात्र काही वेळातच ट्विट डिलिट करुन माघारही घेतली.
विराट कोहलीने स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला होता. 'इच्छा असल्यास प्रत्येक दिवस हा व्हेलेंटाईन डे असतो. तुझ्यामुळे माझा प्रत्येक दिवस सारखा असतो', असे कॅप्शनही विराटने या फोटोला दिले होते.
इतकेच नाही तर फोटोसोबत त्याने अनुष्काला टॅगही केले होते. या फोटोवरुन विराट-अनुष्काने एकमेकांना वेळ देत व्हेलेंटाईन डे साजरा केल्याचं दिसले.
पण, काही वेळानंतर विराटने ट्विटरवर शेअर केलेला फोटो डिलिटदेखील केला.
दरम्यान, ट्विटरवरुन त्याने पोस्ट केलेला फोटो डिलिट जरी केला असला तरी इस्टाग्रामवर त्याचा फोटो दिसत आहे.