हेन्री निकोल्सने न्यूझीलंडला सावरले

By Admin | Updated: March 17, 2017 00:27 IST2017-03-17T00:27:09+5:302017-03-17T00:27:09+5:30

हेन्री निकोल्सच्या पहिल्या कसोटी शतकाच्या बळावर न्यूझीलंड संघाने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्यास यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून

Henri Nicholls turned to New Zealand | हेन्री निकोल्सने न्यूझीलंडला सावरले

हेन्री निकोल्सने न्यूझीलंडला सावरले

वेलिंग्टन : हेन्री निकोल्सच्या पहिल्या कसोटी शतकाच्या बळावर न्यूझीलंड संघाने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्यास यश मिळवले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करल्यानंतर, न्यूझीलंडने पहिल्या तासातच अवघ्या २१ धावांत तीन फलंदाज गमावले होते आणि अखेरच्या सत्रात हा संघ २६८ धावांत सर्वबाद झाला. त्यात डावखुरा निकोल्सने ११८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने त्यांचे दोन्ही सलामीवीर गमावले.
त्यात पहिल्या कसोटीतील शतकवीर डीन एल्गर आणि सूर न गवसलेल्या स्टीफन कुक यांचा समावेश होता.
(वृत्तसंस्था)

Web Title: Henri Nicholls turned to New Zealand