बास्केटबॉलपटूचा हृदयविकाराने मृत्यू
By Admin | Updated: February 12, 2015 06:25 IST2015-02-12T06:25:08+5:302015-02-12T06:25:08+5:30
बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) मैदानावर व्यायाम करताना आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू अक्षय भोसलेचा (२३) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

बास्केटबॉलपटूचा हृदयविकाराने मृत्यू
पुणे : बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) मैदानावर व्यायाम करताना आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू अक्षय भोसलेचा (२३) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एका चांगल्या खेळाडूचा दुर्दैवी अंत झाल्याने क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे तो बुधवारी सकाळी मैदानावर आला होता. धावत पहिली फेरी पूर्ण करीत असताना चक्कर येऊन तो कोसळला. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.