हॉकीत सोलापूरच्या मुली अग्रेसर 9999
By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:38+5:302014-08-28T20:55:38+5:30
सोलापुरात 1958 पासून खर्या अर्थाने हॉकीची सुरुवात झाली़ सत्तरीच्या दशकात तराळ मास्तर, विद्यमान हॉकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम सय्यदसारख्या खेळाडूंनी पुढाकाराने हॉकीस प्रारंभ केला़ 1976 साली जिल्हा हॉकी संघटनेस मान्यता मिळाली़ सुरुवातीला जेमतेम खेळाडूच मैदानावर दिसायच़े सोलापूर जिमखान्याच्या माध्यमातून 1958 पासून हॉकीसाठी खेळाडू मैदानात उतरू लागल़े यावेळी हॉकीसह फुटबॉल, क्रिकेटसारखे खेळ खेळले जायच़े त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने हॉकीचा जिल्?ात प्रचार व प्रसार होत राहिला़

हॉकीत सोलापूरच्या मुली अग्रेसर 9999
स लापुरात 1958 पासून खर्या अर्थाने हॉकीची सुरुवात झाली़ सत्तरीच्या दशकात तराळ मास्तर, विद्यमान हॉकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम सय्यदसारख्या खेळाडूंनी पुढाकाराने हॉकीस प्रारंभ केला़ 1976 साली जिल्हा हॉकी संघटनेस मान्यता मिळाली़ सुरुवातीला जेमतेम खेळाडूच मैदानावर दिसायच़े सोलापूर जिमखान्याच्या माध्यमातून 1958 पासून हॉकीसाठी खेळाडू मैदानात उतरू लागल़े यावेळी हॉकीसह फुटबॉल, क्रिकेटसारखे खेळ खेळले जायच़े त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने हॉकीचा जिल्?ात प्रचार व प्रसार होत राहिला़1990 पासून मुलींचा सहभाग वाढलाक्रीडा मार्गदर्शक जरार कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1990 साली पहिल्यांदा मुलींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली़ त्यानंतर आजपर्यंत मुलींचा सहभाग वाढत राहिला आणि आज अशी परिस्थिती आहे की, जिल्?ात मुलींचा हॉकीतील सहभाग अधिक असल्याचे दिसून येत आह़ेआज मुलींचे आठ तर मुलांचे 15 संघ आहेत़ अब्दुल करीम सय्यद व जरार कुरेशी यांच्या माध्यमातून जवळपास 50 हून अधिक राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत़50 वर्षांत पहिल्यांदा उल्लेखनीय कामगिरीगेल्या दोन वर्षांत मुलींच्या कामगिरीत आमूलाग्र सुधारणा झाली आह़े 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी केली़ ही सोलापूरच्या हॉकी इतिहासातील सर्वात आनंददायी घटना होती़ कारण, मुलींनी 50 वर्षांनंतर अशी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली होती़ 2012 साली मुंबई येथील राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले होत़े 17 वर्षांखालील मुलींनी तृतीय स्थान प्राप्त करीत हॉकीतील यशाची परंपरा उज्ज्वल ठेवली आह़े आज जवळपास 14 हून अधिक राष्ट्रीय पदके सोलापूरच्या संघाने प्राप्त केली आहेत़ 1980 साली रायगड येथील राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींनी सहभाग नोंदवला होता़ 2011 साली 9 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती़ 2012 साली 2 मुले तर 6 मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती़ 2011 साली 14 वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व सोलापूरच्या सहस्रार्जुन प्रशालेची विद्यार्थिनी रेणुका तलवार हिने केले होत़े तसेच श्वेता भुजबळ, गंगा व्हनमाडगी यांनीही आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आह़ेसोलापुरातील राष्ट्रीय खेळाडू:मुले: ज्ञानराज गायकवाड, राहुल आवटे, राहुल सांगनुरे, सोहेल कलादगी, पवन क्षीरसागर, अजय चाबुकस्वार, अजीज तांबोळी़