युवा बॉक्सिंग स्पर्धेत हरियाना, सेनादलाचा दबदबा
By Admin | Updated: January 23, 2017 00:24 IST2017-01-23T00:24:14+5:302017-01-23T00:24:14+5:30
ज्युनिअर विश्व चॅम्पियन मनदीप कौर (५७ किलो गट)ला आज येथे राष्ट्रीय युवा बॉकिसंग स्पर्धेत शेवटच्या दिवशी साक्षीकडून

युवा बॉक्सिंग स्पर्धेत हरियाना, सेनादलाचा दबदबा
नवी दिल्ली : ज्युनिअर विश्व चॅम्पियन मनदीप कौर (५७ किलो गट)ला आज येथे राष्ट्रीय युवा बॉकिसंग स्पर्धेत शेवटच्या दिवशी साक्षीकडून पराभूत व्हावे लागल्याने हरियाना आणि सेना दल (एसएससीबी) हे संयुक्तपणे बरोबरीत राहिले. फायनलमध्ये मनदिपला साक्षीने ४-१ ने पराभूत केले. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
हरियानाने महिलांच्या स्पर्धेत दबदबा राखला. यामध्ये ज्योति (४८ कि.), एकता (५१ किलो) परवीन (५४ कि.) यांनी सुवर्णपदके जिंकली. पुरुषांच्या गटात सेनादलाची आगेकूच राहिली. त्यांच्या वरुणसिंह (४९ कि.), विल्सनसिंह (५२ कि.), मो. एताश खान (५२ कि.) आणि अंकित (५६ कि.) यांनी सुवर्णपदके पटकावली.