हॉकी संघात हरयाणा आणि पंजाबचा दबदबा
By Admin | Updated: July 12, 2016 17:52 IST2016-07-12T17:52:02+5:302016-07-12T17:52:02+5:30
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाची निवड मंगळवारी करण्यात आली. यामध्ये हरयाणा आणि पंजाब राज्यातील खेळाडूंचा ब-यापैकी समावेश करण्यात आला आहे.

हॉकी संघात हरयाणा आणि पंजाबचा दबदबा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाची निवड मंगळवारी करण्यात आली. यामध्ये हरयाणा आणि पंजाब राज्यातील खेळाडूंचा ब-यापैकी समावेश करण्यात आला आहे.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महिला हॉकी संघात फक्त हरयाणातील सहा महिला खेळाडू आहेत. तर, पुरुष हॉकी संघात दोन खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे पुरुष हॉकी संघात पंजाबमधीलच पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. एकंदरित पाहिले, तर दोन्ही संघात ३२ खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या दोन राज्यातून निवड करण्यात आलेल्या खेळांडूची संख्या १३ आहे.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुशीला चालू महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे, तर पुरुष हॉकी संघाचे पी आर श्रीजेश करणार आहे.