हर्षा भोगले कॉलम जोड...
By Admin | Updated: July 11, 2014 21:45 IST2014-07-11T21:45:38+5:302014-07-11T21:45:38+5:30
मुरली विजयने आयपीएलदरम्यान इंग्लंडमधील परिस्थितीविषयी केव्हिन पीटरसनकडून जाणून घेतले होते. फलंदाजी कशी करायची. स्विंग मारा, उसळी घणारे चेंडू, खेळपीवरील हिरवळ, दडपणात कसे खेळावे या सर्व बाबींवर इत्थंभूत जाणून घेतले. येथील ढगाळ वातावरणात फलंदाजीला येण्याची वेळ मुरलीवर आली होती. सकाळच्या सत्रात नवा चेंडू स्विंग होत होता. नंतर मुरलीने अनुभव पणाला लावला. संयमीवृत्ती दाखवून शतक गाठलेच.

हर्षा भोगले कॉलम जोड...
म रली विजयने आयपीएलदरम्यान इंग्लंडमधील परिस्थितीविषयी केव्हिन पीटरसनकडून जाणून घेतले होते. फलंदाजी कशी करायची. स्विंग मारा, उसळी घणारे चेंडू, खेळपट्टीवरील हिरवळ, दडपणात कसे खेळावे या सर्व बाबींवर इत्थंभूत जाणून घेतले. येथील ढगाळ वातावरणात फलंदाजीला येण्याची वेळ मुरलीवर आली होती. सकाळच्या सत्रात नवा चेंडू स्विंग होत होता. नंतर मुरलीने अनुभव पणाला लावला. संयमीवृत्ती दाखवून शतक गाठलेच. एकाग्रचित्ताने खेळून विजयने टी-२० शतक तसेच सहा तास किल्ला लढवित ठोकलेले शतक यात किती तफावत असते हे दाखवून दिले. विजयची ही खेळी कारकीर्दीला कलाटणी देणारी होती. त्याने स्वत:चा अनुभव पणाला लावून यशाचे नवे शिखरही काबीज केले.कसोटीतील स्पर्धात्मकतेचा विचार केल्यास नॉटिंघमची खेळपट्टी फारच कुचकामी म्हणावी लागेल. क्रिकेट हा खेळ एक संघविरुद्ध दुसरा संघ किंवा एका संघाचे कौशल्य विरुद्ध प्रतिस्पर्धी संघाचे कौशल्य असा लढा नसतो. उत्तम दर्जाचे जलद गोलंदाज अखेरच्या गड्यासाठी जेव्हा १११ धावांची भागीदारी होऊ देतात यातून गोलंदाजांच्या उणिवा चव्हाट्यावर येतात. भुवनेश्वर आणि शमी या दोघांनी फार सुरेख फलंदाजी केली. भुवनेश्वर तर मुरब्बी फलंदाजासारखा खेळत होता. पण अनेक मोठ्या संघांविरुद्ध तयाचे फलंदाज संयम दाखवित नाहीत हे सत्य आहे. लंकेविरुद्ध मालिका खेळली गेली तीच उत्सुकता भारताविरुद्ध मालिकेत दिसावी अशी आशा आहे. कसोटी मालिका संस्मरणीय व्हायची झाल्यास स्थानिक संघाला पूरक ठरणाऱ्या खेळपट्ट्या जरूर असाव्यात पण त्यातही खेळपट्ट्या लाईव्ह असाव्यात, तेव्हाच थरार अनुभवायला मिळतो.(टीसीएम)